मुंबई संघाचा युवा फलंदाज सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या बॅटमधून आग ओकत आहे. तो एकापाठोपाठ एक शतक झळकावत भारतीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधत आहे. मात्र, जबरदस्त प्रदर्शन करूनही त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाहीये. यावर मोठा वादही झाला होता. मात्र, आता सरफराजचा भाऊ मुशीर खान भलताच चर्चेत आहे. 25 वर्षीय सरफराजच्या नावावर रणजीत त्रिशतकाची नोंद आहे. आता त्याचा लहान भाऊ मुशीर खान याने कर्नल सीके नायडू ट्रॉफीत मोठ्या भावाच्या अंदाजात फलंदाजी केली आहे. त्याने मुंबईकडून खेळताना हैदराबादविरुद्ध त्रिशतक झळकावले आहे.
मुशीरने साकारली 339 धावांची खेळी
मुंबई संघाच्या मुशीर खान (Musheer Khan) याने हैदराबादविरुद्ध फलंदाजी करताना 339 धावांची मोठी खेळी साकारली आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबई संघाने 8 विकेट्स गमावत 704 धावा कुटल्या. तसेच, डाव घोषित केला. मुशीरने यावेळी 367 चेंडूंचा सामना करताना 339 धावा चोपल्या. यावेळी त्याच्या बॅटमधून 9 षटकार आणि 34 चौकारांचा पाऊस पडला. मुशीरव्यतिरिक्त मुंबईच्याच अथर्व अंकोलेकर यानेही द्विशतकी खेळी साकारली. त्याने यावेळी 249 चेंडूत 11 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 214 धावा कुटल्या.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1617425598762356738
मुशीर खान मुंबई संघाकडून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तो 19 वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्वही करू शकतो. मुशीरला रणजी ट्रॉफीच्या मागील हंगामात मुंबई संघातही सामील करण्यात आले होते. मात्र, त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही. रणजीत पदार्पण करण्याची प्रतीक्षा या हंगामात संपली.
मुशीरचे वक्तव्य
त्याने म्हटले होते की, “मी या दिवसाची दीर्घ काळापासून वाट पाहत होतो. मात्र, मला माहिती नव्हते की, हे इतक्या लवकर येईल.” तो पुढे म्हणाला होता की, “मी माझ्या वडिलांकडून आणि भावाकडून रणजी ट्रॉफीबद्दल खूप काही ऐकले आहे. मला जेव्हा मुंबईकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती, तेव्हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते.”
मुशीर मुंबईसाठी स्थानिक क्रिकेटमध्ये दीर्घ काळापासून धावा करत आहे. अ विभागामध्ये त्याने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये शतक ठोकले होते. जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या सामन्यात त्याने 133 चेंडूत 172 धावांची खेळी साकारली होती. मुशीरची कामगिरी पाहता त्याला पुन्हा रणजीत खेळण्याची संधी मिळाली.
मुशीरची रणजी कारकीर्द
मुशीर मुंबई संघाकडून आतापर्यंत फक्त 3 रणजी सामने खेळला आहे. त्यातील 5 डावात फलंदाजी करताना त्याने 19.20च्या सरासरीने 96 धावा केल्या आहेत. यादरम्यान 42 ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली आहे, जी त्याने आसामविरुद्ध खेळताना साकारली होती. विशेष म्हणजे, त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट्सही घेतल्या आहेत. (cricketer sarfaraz khan brother musheer khan smashed triple century in ck naidu trophy playing for mumbai)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजी सोडा आणि बुधवारपर्यंत रांचीत पोहोचा, पृथ्वी शॉसह ‘या’ खेळाडूंना बीसीसीआयचा आदेश
“सूर्या आणि बटलर कुठेही धावा करू शकतात,” स्वतः दिग्गज गोलंदाजानेच केलं कौतुक






टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर