भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी20 सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाला 65 धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादव याने गोलंदाजांचा घाम काढला. त्याने शानदार शतक झळकावले. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या टीम साऊदी या गोलंदाजानेही हॅट्रिक घेत भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. याव्यतिरिक्त सामन्यात आणखी एक विचित्र घटना घडली. ती म्हणजे श्रेयस अय्यर ज्या पद्धतीने बाद होण्याची. तो चेंडू स्टंप्सला न लागता, झेल न घेता आणि धावबाद न होताही बाद झाला.
आता असा प्रश्न पडला असेल की, मग श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) बाद कसा झाला? तर तो ज्या पद्धतीने बाद झाला, त्याला हिट विकेट असे म्हणतात. अशाप्रकारे बाद होणारा श्रेयस भारताचा चौथा, तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 25वा फलंदाज आहे.
ईशान किशन बाद झाल्यानंतर आला होता फलंदाजीला
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली होती. भारताने पहिले पाच षटके एकही विकेट गमावली नव्हती. मात्र, सलामीवीराच्या रूपात फलंदाजीला आलेल्या रिषभ पंत सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याच्यानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव याने डाव सांभाळला. मात्र, नंतर ईशानही 36 धावा करून बाद झाला.
https://twitter.com/VinodNa66839310/status/1594241376056934400?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1594241376056934400%7Ctwgr%5E7f360f21a48e93ec7fba164a761aafbe7ed21b46%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Fwatch-video-shreyas-iyer-hit-wicket-in-2nd-t20i-india-vs-new-zealand%2Farticleshow%2F95639303.cms
हिट विकेट झाल्यानंतरही कळले नाही
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यर याने सर्वांचे लक्ष वेधले. अय्यर विचित्र पद्धतीने बाद झाला. तो चांगली फलंदाजी करत होता, पण हिट विकेट झाला. तो डीप स्क्वेअर लेकच्या दिशेने एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात खूपच मागे गेला आणि त्याचा पाय स्टंप्सवर लागला. यावेळी अय्यर धाव घेण्यासाठीही धावला, पण त्याला सांगण्यात आले की, तो बाद झाला आहे. यावेळी तो रागाच्या भरात तंबूच्या दिशेने रवाना झाला.
Shreyas Iyer gets out in an unfortunate way – HIT WICKET💔#NZvIND pic.twitter.com/FqtQjiskHW
— Faiz Fazel (@theFaizFazel) November 20, 2022
आता अय्यर बाद होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यानंतरही सूर्यकुमार यादव दुसऱ्या बाजूने आपली फटकेबाजी सुरूच ठेवत होता. त्याने याच फॉर्मात आपले शतक साजरे केले. त्याने फक्त 51 चेंडूत 111 धावा चोपल्या. तसेच, तो एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावणारा भारतीय फलंदाज बनला. सूर्याने आपल्या खेळीत 217.65च्या स्ट्राईक रेटने 7 षटकार आणि 11 चौकारही मारले.
सूर्याचे शतक आणि साऊदीची हॅट्रिक
सूर्यकुमारच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 191 धावा चोपल्या. यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना टीम साऊदी (Tim Southee) याने हॅट्रिक घेतली. साऊदीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील आपली दुसरी हॅट्रिक घेतली. त्याने यावेळी हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची सलग विकेट घेत हॅट्रिक साजरी केली. (cricketer shreyas iyer hit wicket in 2nd t20i india vs new zealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्या बनला थलायवा! एकाच चेंडूवर मारले 6 वेगवेगळे शॉट्स, सोशल मीडियावर रंगलीय व्हिडिओची चर्चा
मागच्या 10 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड, न्यूझीलंडने मिळवले फक्त ‘एवढे’ विजय