---Advertisement---

भारतीयांसाठी मोठी बातमी! इंग्लंडमध्ये यशस्वीरीत्या पार पडली श्रेयस अय्यरची सर्जरी, पण ‘ही’ समस्या कायम

On: शुक्रवार, एप्रिल 21, 2023 1:01 PM
Shreyas-Iyer
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. श्रेयसच्या कंबरेच्या दुखापतीबाबत मोठी माहिती आली आहे. लंडन येथे त्याच्या कंबरेवर सर्जरी झाली आहे. त्यामुळे आता त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस जून महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनादेखील खेळू शकणार नाहीये. मात्र, यावर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषकापर्यंत तो पूर्णपणे फिट होण्याची शक्यता आहे.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मागील काही काळापासून कंबरेच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच खेळण्यात आलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो चौथ्या कसोटीच्या शेवटच्या डावात फलंदाजीही करू शकला नव्हता. यानंतर श्रेयस इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या (IPL 2023) हंगामातूनही बाहेर पडला. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत नितीश राणा (Nitish Rana) याच्या खांद्यावर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रेयस अय्यरची सर्जरी (Shreyas Iyer Surgery) गुरुवारी (दि. 20 एप्रिल) झाली होती. त्याला लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळू शकते. तसेच, तो भारतात रवाना होऊ शकेल. त्याला पुढील काही महिने विश्रांती घ्यावा लागेल.

चौथ्या क्रमांकावर खेळतो श्रेयस अय्यर
सर्जरीचा सामना करणारा श्रेयस तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर सरावाला सुरुवात करू शकतो. त्याला पूर्णत: फिट होण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल. याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे की, तो विश्वचषकापर्यंत फिट होईल.

खरं तर, श्रेयस वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचा खेळाडू आहे. तो खेळला नाही, तर चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघाला नवीन फलंदाज शोधावा लागेल. नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाने श्रेयसच्या जागी सूर्यकुमार यादव याला आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा हा डाव पूर्णत: फसला. आता चौथ्या स्थानावरील खेळाडूबद्दल संघ व्यवस्थापन काय निर्णय घेतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (cricketer shreyas iyer underwent successful surgery but unlikely to play wtc final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लॉकडाऊनने कसं फळफळलं सिराजचं नशीब? पठ्ठ्याने स्वत:च केला रहस्याचा उलगडा
दिल्लीच्या विजयासह वॉर्नरचा भीमपराक्रम! रोहितचा अशक्य वाटणारा रेकॉर्ड टाकला मोडला, बनला टॉपर खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---