भारतीय संघाकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यशस्वी जयसवाल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. नियमित सलामीवीर शुबमन गिल या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. मात्र, हा निर्मय का घेतला गेला? याविषयी क्रिकेटविश्वात चर्चा आहे. आता शुबमनने समोर येत याचा खुलासा केला आहे. चला तर, शुबमनने असा निर्णय का घेतला, हे जाणून घेऊयात…
शुबमन गिल (Shubman Gill) म्हणाला की, तो तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाची भूमिका सलामीवीरापेक्षा वेगळी समजत नाही. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजारा याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी युवा फलंदाज यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) हा सलामीवीर फलंदाज म्हणून खेळत आहे.
तिसऱ्या क्रमांकावर खेळणार गिल
पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना गिल म्हणाला की, “संघ व्यवस्थापनाने) मला विचारले की, मला कोणत्या क्रमांकावर खेळायचे आहे. मी म्हणालो की, मला तिसऱ्या स्थानी फलंदाजी करायची आहे. ही एक अशी स्थिती आहे, जिथे मला मजबूत व्हायचे आहे.” तो असेही म्हणाला की, “भारतीय संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा अनुभव फायदेशीर राहील.”
‘तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात फरक नाही’
पुढे बोलताना गिल असेही म्हणाला की, “नवीन चेंडूने खेळणे नेहमीच चांगले असते. माझ्याकडे नवीन चेंडूचा अनुभव आहे. जेव्हा तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करता, तेव्हा हे सलामीला फलंदाजी करण्यापेक्षा वेगळे नसते. मात्र, यामध्ये थोडा फरक असतो” त्याने असे म्हटले की, तो स्वत:ला अद्याप वरिष्ठ खेळाडू मानत नाही.
पुढे गिलने असे सांगितले की, त्याने एक महिन्याच्या विश्रांतीचा आनंद घेतला. तसेच, त्याने कुटुंबासोबत बराच वेळ घालवला. तो म्हणाला, “बार्बाडोसमध्ये ही माझी पहिली वेळ होती. डॉमिनिकामध्येही पहिलीच वेळ आहे. आम्ही खूप आधी आलो होतो आणि चांगला सराव केला.”
मुख्य प्रशिक्षकासोबत केली चर्चा
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने गिलच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल कारण त्याला स्वत:ला या क्रमांकावर खेळायचे आहे. त्याने राहुल द्रविड यांच्याशी चर्चाही केली आहे. गिलने द्रविडला म्हटले की, मी माझे क्रिकेट तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच खेळलो आहे. गिलला वाटते की, तो तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करून संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो.”
भारत 70 धावांनी मागे
वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात सर्वबाद 150 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सलामीला यशस्वी जयसवाल आणि रोहित शर्मा (Yashasvi Jaiswal And Rohit Sharma) उतरले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी (नाबाद 40) आणि रोहित (नाबाद 30) यांच्या जोरावर भारतीय संघाने एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या. भारताला आव्हान पार करण्यासाठी अजून 70 धावांची गरज आहे. (cricketer shubman gill reveals reason behind batting at no 3 reveal conversation with rohit sharma and rahul dravid)
महत्वाच्या बातम्या-
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद
महिलांच्या ऍशेसमध्ये पाहायला मिळाला अफलातून कॅच, खेळाडूने उडी मारून एका हाताने टिपलेला झेल पाहाच