क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकणारे अष्टपैलू खेळाडू फार कमी आहेत. त्यातही एखादा खेळाडू फलंदाजीसह दोन्ही हातांनी गोलंदाजी करत असेल तर फारच नवल. असाच एक खेळाडू मध्य प्रदेशात आहे. सोहम पटवर्धन असं या ज्युनियर क्रिकेटपटूचं नाव असून तो फलंदाजीसोबतच दोन्ही हातांनी नियमित गोलंदाजी करतो. आता त्याच्या या विशेष क्षमतेची दखल बीसीसीआयनं घेतली आहे.
बीसीसीआयनं बंगळुरू येथे आयोजित हाय परफॉर्मन्स कॅम्पसाठी सोहम पटवर्धनची निवड केली आहे. सोहम हा डाव्या हातानं फलंदाजीसह दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो. तो उजव्या हातानं ऑफ-स्पिन आणि डाव्या हातानं ऑर्थोडॉक्स गोलंदाज करतो. कोणत्या हातानं गोलंदाजी करायची, याचा निर्णय तो परिस्थितीनुसार घेतो.
सोहमचे प्रशिक्षक देवाशिष निलोसे यांनी सांगितलं की, “तो अत्यंत प्रतिभावान खेळाडू असून, खेळात सुधारणा करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. त्याची मैदानावरील कामगिरी याची साक्ष आहे. तो सतत प्रयत्न करतो आणि त्याचं तंत्र सुधारतो. बीसीसीआयनं आयोजित केलेल्या हाय परफॉर्मन्स कॅम्पमध्ये त्याला सुधारण्यासाठी आणखी मदत मिळेल.”
सोहमचे वडील निखिल हे माजी रणजी खेळाडू आहेत. ही त्यांच्या कुटुंबातील क्रिकेटपटूंची तिसरी पिढी आहे. सोहमचे आजोबा अशोक पटवर्धन हे मध्य प्रदेशच्या 19 वर्षांखालील संघाचे कर्णधार होते. सोहमनं आंतरविभागीय 18 वर्षांखालील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जबलपूरविरुद्ध 308 धावांची इनिंग खेळली होती. याशिवाय त्यानं कूचबिहार ट्रॉफीमध्ये हरियाणाविरुद्ध 117 धावा आणि राजस्थानविरुद्ध 94 धावा ठोकल्या आहेत. तसेच त्यानं दिल्लीविरुद्ध मध्य प्रदेशच्या 23 वर्षांखालील संघासाठी 90 धावांची खेळीही खेळली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचे दिग्गज फलंदाज अमेरिकेत पूर्णपणे प्लॉप, आकडेवारी पाहून बसेल धक्का!
ऑस्ट्रेलियाच्या विजयासह इंग्लंडला मिळालं सुपर 8 चं तिकीट, आतापर्यंत 7 संघ पात्र
टी20 विश्वचषकादरम्यान दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती, दोन देशांकडून खेळला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट