---Advertisement---

भारत विरुद्ध कॅनडा सामन्यावर पावसाचं सावट! पाहा हवामान अंदाज

ind vs can
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 33वा सामना आज (15 जून) रोजी भारत विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना फ्लोरिडामधील लाॅडरहिल या मैदानावर रंगणार आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकातील साखळीफेरीतील भारताचा शेवटचा आहे. तत्पूर्वी या सामन्यावर पावसाचं सावट आहे. मागील तीन दिवसांपासून फ्लोरिडाच्या लाॅडरहिल मैदानावर पाऊस पडत आहे.

(14 जून) रोजी याच मैदानावर अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये सामना खेळला जाणार होता. परंतु सामन्यापूर्वी पावसानं हजेरी लावली आणि हा सामना होऊच दिला नाही. त्यामुळे अमेरिका संघाला याचा फायदा झाला. अमेरिका संघ ग्रुप-अ मधून सुपर 8 साठी क्वालिफाय होणारा भारतीय संघानंतर दुसरा संघ ठरला. आणि ग्रुप-अ मधून पाकिस्तान संघ या सामन्यावर अवलंबून होता. परंतु अमेरिकेला एक गुण मिळाल्यानं पाकिस्तान यंदाच्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडला.

भारत विरुद्ध कॅनडा या सामन्यावर पावसाचं सावट नक्कीच असणार आहे. कारण हवामान खात्यानं दुपार पासून संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसानं जर भारत विरुद्ध कॅनडा सामन्यात खोळंबा घातला तर सामना रद्द होईल किंवा सामन्याच्या ओव्हर कमी करुन हा सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे.

यंदाच्या टी20 विश्वचषकात कॅनडा संघ साखळीफेरीतील 3 सामने खेळला. त्यामध्ये त्यांचा 2 सामन्यांमध्ये पराभव झाला. तर आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी चमकदार कामगिरी केली आणि विजय मिळवला. यंदाच्या टी20 विश्वचषकातील कॅनडाचा भारताविरुद्ध अखेरचा सामना आहे.

भारतानं यंदाच्या टी20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चमकदार केली आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतानं अद्याप एकही सामना गमावला नाही. त्यांनी विजयाची हॅट्रिक लगावली. पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड या संघांना भारतानं धूळ चारत विजयी मोहिम चालूच ठेवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! माझी सर्व कमाई दान करणार; टी20 विश्वचषकादरम्यान रिषभ पंतने दिले वचन
मोठी बातमी! न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचा हा शेवटचा टी20 विश्वचषक असेल, स्वत: केली घोषणा
भारत विरुद्ध कॅनडा सामन्यात कर्णधार रोहित शर्माला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी!

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---