---Advertisement---

महिलांच्या ऍशेसमध्ये पाहायला मिळाला अफलातून कॅच, खेळाडूने उडी मारून एका हाताने टिपलेला झेल पाहाच

On: गुरूवार, जुलै 13, 2023 1:45 PM
Sophie-Ecclestone
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात 1 कसोटी, 3 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले जाणार आहेत. यातील कसोटी आणि टी20 मालिका पार पडली आहे. तसेच, वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 12 जुलै) काऊंटी ग्राऊंड, ब्रिस्टल येथे पार पडला. हा सामना इंग्लंड संघाने 2 विकेट्सने आपल्या नावावर केला. यासोबतच इंग्लंडची महिला खेळाडू सोफी एक्लेस्टोन हिने टिपलेला झेल सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय इंग्लंडच्या खेळाडूंनी सपशेल चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 263 धावा केल्या होत्या. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डावातील 13व्या षटकादरम्यान सोफी एक्लेस्टोन हिने शानदार झेल टिपला.

या षटकात ऑस्ट्रेलियाची स्टार फलंदाज एलिस पेरी (Ellyse Perry) आणि फोबे लीचफील्ड (Phoebe Litchfield ) फलंदाजी करत होते. यावेळी स्ट्राईक लीचफील्ड हिच्याकडे होती. तसेच, इंग्लंडकडून नॅट सायव्हर-ब्रंट गोलंदाजी करत होती. नॅटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर लीचफील्डने सरळ मिड ऑनच्या दिशेने चेंडू मारला. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या सोफी एक्लेस्टोन (Sophie Ecclestone) हिने शानदार झेल पकडला. विशेष म्हणजे, तिने यावेळी एका हाताने झेल पकडला. हा झेल पकडणे अनेक खेळाडूंसाठी खूपच कठीण असते. आता यादरम्यानचा व्हिडिओ सर्वांच्या भुवया उंचावत आहे.

सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाने 263 धावांचा डोंगर उभारताना बेथ मूनी हिने सर्वाधिक 81 धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त एलिस पेरीने 81 धावा, फोबे लीचफील्डने 34 धावा, जेस जोनासनने 30 धावा, ताहलिया मॅकग्राने 24 आणि ऍशले गार्डनरने 21 धावांचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त इतर एकही फलंदाज 20 धावांचा आकडाही पारकरू शकला नाही.

यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना नॅट आणि लॉरेन बेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, इतर चारही गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या 282 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 48.1 षटकात 267 धावा केल्या आणि सामना 2 विकेट्सने जिंकला. यावेळी इंग्लंडकडून कर्णधार हीदर नाइट हिने सर्वाधिक नाबाद 75 धावांचे योगदान दिले. तिच्याव्यतिरिक्त सलामी फलंदाज टॅमी ब्यूमाँटने 47, ऍलिस कॅप्सीने 40 आणि नॅट सायव्हर-ब्रंटने 31 धावांचे योगदान दिले. यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. मात्र, इंग्लंड संघाने विजय मिळवून मालिकेत 1-0ने आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍशले गार्डनर हिने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, जॉर्जिया वेअरहॅमने 2, तर एलिस पेरी, मेगन शट आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (cricketer sophie ecclestone grabs a stunner catch of phoebe litchfield in odi series against australia women)

महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही त्याच्यासाठी संघातील वातावरण…’, युवा पदार्पणवीराबद्दल अश्विनचं मोठं भाष्य
यशस्वी-रोहितकडून 40 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरागवृत्ती, गावसकर-शास्त्रींशी मोठे कनेक्शन; वाचा लगेच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---