Babar Azam Video: ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना जिंकला. यासह मालिकेत 2-0ने आगाडी घेतली. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे खेळला गेलेला बॉक्सिंग डे कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपला. हा सामना एकेवेळी रोमांचक वळणावर पोहोचला होता. मात्र, अखेरीस पाकिस्तानला 79 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेली कसोटी मालिका पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आजम (Babar Azam) याच्यासाठी खास ठरताना दिसत नाहीये. तो मेलबर्न कसोटीत 1 धाव करून बाद झाला, तर दुसऱ्या डावात 41 धावांवर तंबूत परतला. जेव्हा तो फलंदाजी करत होता, तेव्हा स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेला ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) त्याला काहीतरी बोलताना दिसला. आता दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील 33 षटके पूर्ण झाली होती. बाबरसोबत क्रीझवर त्यावेळी सौद शकील होता. बाबर लयीत दिसत होता आणि जेव्हा चेंडूचा सामना करण्यासाठी तयार होत होता, तेव्हा स्मिथ त्याला पाठीमागून काहीतरी बोलून त्रास दिल्यासारखे करत होता. यावेळी बाबर एकदम मागे वळला आणि स्मिथला बॅट देऊन असे म्हणताना दिसला की, ‘ये तू फलंदाज कर.’ यानंतर स्मिथने बाबरपुढे हात जोडले. आता हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधत आहे.
https://twitter.com/CricCrazyNIKS/status/1740627460973265047?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1740627460973265047%7Ctwgr%5E1e993e7c3fa77d59ff9cd63a5bc9d7179ec77473%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-steve-smith-was-troubling-him-babar-azam-showed-his-bat-smith-folded-his-hands-watch-funny-video-9130817.html
सामन्यात काय घडलं?
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान 264 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 262 धावा केल्या. तसेच, पाकिस्तानला दुसऱ्या डावात 237 धावांवर सर्वबाद करत सामना 79 धावांनी जिंकला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद याने 60 धावांची खेळी केली. पाकिस्तान संघ एकेवेळी 5 बाद 219 धावसंख्येवर होता. असे वाटत होते की, पाकिस्तान संघ हा सामना जिंकू शकतो. मात्र, मोहम्मद रिझवान 35 धावा करून पॅट कमिन्सची शिकार बनला. कमिन्सने यानंतर आमिर जमाल, शाहीन आफ्रिदी यांनाही खाते खोलू दिले नाही. कमिन्सने दोन्ही डावात प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. (cricketer steve smith was troubling him babar azam showed his bat smith folded his hands see funny video)
हेही वाचा-
भारताला पहिल्या कसोटीत हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, कर्णधार बावुमा दुसऱ्या कसोटीतून बाहेर
रबाडा… नाम तो सुना होगा! रोहितला शून्यावर बाद करत घडवला इतिहास, केली जगभरात कुणालाच न जमलेली डेरिंग