वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा काळीज तोडणारा पराभव झाला. यानंतर आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत आमने-सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 23 नोव्हेंबर) विशाखापट्टणम येथे खेळला जाईल. हार्दिक पंड्या आणि इतर वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर आहे. अशात सूर्या टी20 संघाचे नेतृत्व करणारा 9वा भारतीय कर्णधार आहे. नेहमीप्रमाणे सामन्याच्या एक दिवस आधी ज्याप्रकारे कर्णधार पत्रकार परिषद घेतात, तशीच बुधवारी (दि. 22 नोव्हेंबर) सूर्यानेही पत्रकार परिषद घेतली. मात्र, ही पत्रकार परिषद सूर्या उभ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या टी20 सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेला हजर झाला. यावेळी त्यालाही धक्का बसला असेल. यामागील कारण म्हणजे, सूर्याच्या पत्रकार परिषदेला 2 पत्रकार (suryakumar yadav as captain first press conference attended only 2 jounralists) उपस्थित होते. एवढंच नाही, तर ही पत्रकार परिषद फक्त 3 मिनिटे आणि 32 सेकंदार संपली.
सोशल मीडियावर क्रीडा पत्रकाराने दिली माहिती
वरिष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमारने एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चकित करणाऱ्या पत्रकार परिषदेविषयी संपूर्ण माहिती शेअर केली. त्याने लिहिले की, “एकीकडे विश्वचषकादरम्यान भारतात 200पेक्षा जास्त पत्रकार पोहोचले, अशात इथे फक्त 2 पत्रकार? हे हैराण करणारे आहे. सूर्याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत अशाप्रकारची कल्पनाही केली नसेल. ही भारतात पत्रकार परिषदेतील सर्वात कमी उपस्थितीचा विक्रम आहे का? मला तर असेच वाटते.”
From 200 odd media people (during World Cup) to just two in press conference in India is
staggering!SKY wouldn’t have imagined this in his firstPC as captain.
Is this a record with fewest attendance in a press conference in India?
I would imagine so. pic.twitter.com/O41WbIUKla— Vimal कुमार (@Vimalwa) November 22, 2023
भारतीय खेळाडूंवर चाहते नाराज?
विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या पराभवानंतर क्रिकेटप्रेमी निराश आहेत. क्रिकेटप्रेमी भारतीय खेळाडूंचे विश्वचषक 2023 (World Cup 2023) अंतिम सामन्यातील प्रदर्शन पचवू शकत नाहीयेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात क्रिकेटप्रेमी अंतिम सामन्यातील भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनावर टीका करताना दिसत आहेत. (cricketer suryakumar yadav as captain first press conference attended only 2 jounralists ahead of ind vs aus 1st t20)
हेही वाचा-
कर्णधार रोहित टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत? टी-20 वर्ल्डकपआधी समोर आली महत्वाची माहिती
‘भारताने वर्ल्डकप जिंकला असता…’, माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले पराभवाचे कारण