आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी असणारा आणि टी20 तज्ज्ञ म्हणून ओळखला जाणारा भारतीय खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव होय. सूर्यकुमारची टी20 क्रिकेटमधील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये त्याला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. मात्र, त्याने शुक्रवारी (दि. 22 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना कमालच केली. त्याने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलत. भारताने विजय मिळवत सर्व क्रिकेट प्रकारात आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. असे असले, तरीही सूर्याने अर्धशतक मोठा दुष्काळ संपवला.
‘मिस्टर 360’ म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघाचा भाग आहे. त्यामुळे त्याच्यासाठीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेद्वारे लयीत येणे महत्त्वाचं आहे. अशात त्याने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 49 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. हे त्याचे फेब्रुवारी 2022नंतर वनडेतील पहिले अर्धशतक होते. जवळपास 19 डावांनंतर त्याने हा दुष्काळ संपवला.
भारतीय संघ विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. अशात संघासाठी सूर्याने वनडे क्रिकेटमध्ये अशाप्रकारची खेळी साकारणे गरजेचे होते. या खेळीमुळे संघाची मोठी डोकेदुखी दूर शकते. या सामन्यात भारतीय संघाने एकेवेळी 142 धावांच्या जबरदस्त सुरुवातीनंतर 9 धावांतच 3 विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी मधली फळी पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाली. खरं तर, 185 धावसंख्येवर चौथी विकेट पडल्यानंतर सूर्या फलंदाजीला उतरला होता.
मागील मालिकेत सलग 3 डावात शून्यावर बाद
सूर्याने कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याची साथ देत 80 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सूर्याने 49 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने अर्धशतक साकारले. या खेळीच्या जोरावर भारत सहजरीत्या विजयाच्या जवळ पोहोचला. खरं तर, या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च महिन्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत सूर्या सर्व सामन्यात सलग शून्यावर बाद झाला होता. मात्र, त्याने आता जबरदस्त पुनरागमन करत टीकाकारांची बोलती बंद करण्याचे काम केले.
सूर्यकुमारची वनडे कारकीर्द
सूर्यकुमार यादव याने भारताकडून आतापर्यंत एकूण 28 वनडे सामने खेळले आहेत. यातील 26 डावात फलंदाजी करताना त्याने 25.52च्या सरासरीने 587 धावा केल्या आहेत. त्याने या क्रिकेट प्रकारात 3 अर्धशतकही केले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 100 इतका आहे. तसेच, त्याच्या वनडे आणि टी20च्या आकड्यांमध्ये खूपच तफावत आहे. वनडेत त्याने एकही शतक केले नाही, तर टी20त त्याला 3 शतके ठोकण्यात यश आले आहे. तसेच, तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये जगातील अव्वल फलंदाज आहे. (cricketer suryakumar yadav hits odi fifty after 19 months team india major tension before world cup 2023 reduced 2023)
हेही वाचा-
‘अतंत्य जड अंत:करणाने सांगावे लागत आहे…’, World Cup 2023मधून बाहेर होताच पाकिस्तानी गोलंदाज भावूक
‘बाप-बाप होता है…’, सुपरस्टार शाहरुखच्या ट्वीटवर सेहवागचे भन्नाट उत्तर; सर्वत्र रंगलीय चर्चा