दिल्ली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. 1987पासून भारतीय संघाने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमच्या या मैदानावर एकही कसोटी सामना गमावला नाहीये. शुक्रवारपासून (दि. 17 शुक्रवार) उभय संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या ताफ्यात एक बदल करण्यात आला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वादळी फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव हा एकच कसोटी सामना खेळून संघाबाहेर पडला आहे. अशात पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू न शकणारा श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीत संघात परतला आहे.
सूर्याला पुनरागमन करण्यास लागणार 12 वर्षे?
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने नागपुरात झालेल्या कसोटीत फक्त 8 धावा केल्या होत्या. अशात तो दुसऱ्या कसोटीतून संघाबाहेर झाला आहे. आता त्याचे कसोटीत पुनरागमन कठीण झाले आहे. यापूर्वी डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला पदार्पणाच्या कसोटीनंतर दुसऱ्या सामन्यासाठी तब्बल 12 वर्षे वाट पाहावी लागली होती. उनाडकटला 2010नंतर डिसेंबर 2022मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली होती.
चेतेश्वर पुजाराचा 100 वा कसोटी
याव्यतिरिक्त भारतीय संघाचा ‘मिस्टर डिपेंडेबल’ चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हा दिल्ली येथे त्याचा 100वा कसोटी सामना खेळत आहे. त्याच्यासह आतापर्यंत भारताकडून एकूण 13 खेळाडूंनी 100 कसोटी सामने खेळले आहेत.
🚨 Team News 🚨
1⃣ change for #TeamIndia as @ShreyasIyer15 is named in the team. #INDvAUS | @mastercardindia
Follow the match ▶️ https://t.co/hQpFkyZGW8
A look at our Playing XI 🔽 pic.twitter.com/L97F8kAcFA
— BCCI (@BCCI) February 17, 2023
ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात 3 फिरकीपटू
ऑस्ट्रेलिया संघाबाबत बोलायचं झालं, तर त्यांनी त्यांच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये 2 बदल केले आहेत. मॅट रेनशॉ आणि स्कॉट बोलँड यांना संघात स्थान मिळाले नाहीये. तसेच, त्यांच्या जागी फिरकीपटू मॅथ्यू कुह्नेमन आणि ट्रेविस हेड यांना संधी मिळाली आहे. मिचेल स्टार्क आणि कॅमरून ग्रीन हे या सामन्यातही खेळण्यास उतरले नाहीयेत. अशाप्रकारे पाहुण्या संघाच्या ताफ्यात 3 फिरकीपटूंना संंधी मिळाली आहेत.
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-0ने आघाडीवर आहे. भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थेट प्रवेश करण्यासाठी 4 पैकी 3 सामने जिंकायचे आहेत. सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघ अव्वलस्थानी आहे. (cricketer suryakumar yadav not place in playing 11 shreyas iyer got chance team india in 2nd test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन
रिटायर होऊन 5 वर्षे लोटली, पण डिविलियर्सचा ‘हा’ सर्वात खतरनाक विश्वविक्रम आजही अबाधित; जाणून घ्याच