---Advertisement---

चीनच्या भूमीत 20 वर्षीय तिलकने मोडला रोहितचा विक्रम, खेळली टी20 करिअरची सर्वोत्तम Inning

On: शुक्रवार, ऑक्टोबर 6, 2023 3:58 PM
Tilak-Varma-And-Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाचा नव्या दमाचा युवा खेळाडू तिलक वर्मा याने शुक्रवारी (दि. 06 ऑक्टोबर) धमाल कामगिरी केली. चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विजयी खेळी साकारली. त्याच्या या खेळीसोबतच त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने भारतीय वरिष्ठ संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा विक्रम मोडला.

तिलक वर्माची खेळी
तिलक वर्मा (Tilak Varma) याने एशियन गेम्स 2023 (Asian Games 2023) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. त्याने अवघ्या 26 चेंडूत नाबाद 55 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 2 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 211.53 इतका होता. ही तिलकच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

रोहितचा कुठला विक्रम मोडला?
तिलक हा अवघ्या 20 वर्षांचा आहे. त्याने शुक्रवारी आपल्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. अशाप्रकारे तिलक 20 किंवा त्याहून कमी वयात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा भारतीय फलंदाज बनला. तिलकने रोहितचा हा विक्रम मोडित काढला. रोहितने 20 किंवा त्याहून कमी वयात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये फक्त एक अर्धशतक केले होते.

वीस किंवा त्याहून कमी वयात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारे भारतीय
तिलक वर्मा- 2*
रोहित शर्मा- 1

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1710149142406930580

भारताचा दणदणीत विजय
तिलक वर्मा याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेशला उपांत्य सामन्यात 64 चेंडू शिल्लक ठेवत 9 विकेट्सने पराभूत केले. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 विकेट्स गमावत 96 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 9.2 षटकात 1 विकेट गमावत आव्हान पार केले. तिलकने कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 97 धावांची भागीदारी रचली. आता भारतीय संघ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) अफगाणिस्तानला आव्हान देईल. (cricketer tilak varma breaks rohit sharma record of hit most half centuries at the age of 20 or less asian games 2023)

हेही वाचा-
आशियाई गेम्समध्ये भारताने घडवला इतिहास, पहिल्यांदाच झळकावले पदकांचे ‘शतक’
Asian Games: सेमीफायनलमध्ये ऋतुराजसेनेचा दणदणीत विजय, बांगलादेशला नमवत मिळवलं फायनलचं तिकीट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---