क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करणारी जगातील सर्वात मोठी टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये युवा खेळाडू अक्षरश: धावांचा पाऊस पाडत आहेत. यामध्ये आवर्जून घ्यावं असं नाव म्हणजे मुंबई इंडियन्स संघाचा तिलक वर्मा होय. पहिल्याच हंगामात विस्फोटक प्रदर्शन दाखवत तिलक वर्माने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गुरुवारी (दि. १२ मे) मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. मुंबईविरुद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नई संघही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला. मात्र, यादरम्यान मुंबईला विजय मिळवून दिल्यानंतर तिलकने मैदानावर हात जोडल्याचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. काय आहे यामागील नेमकं कारण, हे आपण जाणून घेऊया.
तिलक वर्मा याने का जोडले हात?
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा आनंद घेण्यासाठी तिलक वर्मा (Tilak Varma) याचे लहानपणीचे प्रशिक्षक सलाम बायश हे देखील उपस्थित होते. तिलकने मुंबईला विजय मिळवून दिल्यानंतर आपल्या प्रशिक्षकांना मैदानावरूनच नमस्कार केला. सोशल मीडियावर यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.
Tilak ke liye taaliyan bajti rehni chahiye! 💙👏#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #CSKvMI @TilakV9 pic.twitter.com/kdqvS0wXOD
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2022
तिलक वर्माचा आयपीएल विक्रम
चेन्नईविरुद्ध नाबाद ३४ धावांची खेळी साकारल्यानंतर १९ वर्षांच्या तिलक वर्माने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. तिलक आयपीएलच्या एका हंगामात युवा खेळाडू म्हणून सर्वाधिक धावा चोपणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम रिषभ पंतच्या नावावर होता. पंतने २०१७ साली आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स संघ) संघाकडून १४ सामन्यात ३६६ धावा चोपल्या होत्या. २०१९मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ याने ३५३ धावा केल्या होत्या. शॉ या यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.
Tilak ke liye taaliyan bajti rehni chahiye! 💙👏#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #CSKvMI @TilakV9 pic.twitter.com/kdqvS0wXOD
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2022
Tilak Varma after his innings was thanking his coach who was in the stadium last night. #MIvsCSK #MumbaiIndians pic.twitter.com/wK6Uk87THh
— KG Sports (@TheKGSports) May 13, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
शानदार फलंदाजी करतोय तिलक वर्मा
तिलक वर्मा याने यंदाच्या हंगामात भल्याभल्यांना लाजवेल अशी फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत फक्त १२ सामने खेळले आहेत. हे सामने खेळताना त्याने ४०.८९च्या सरासरीने आणि १३२.८५च्या स्ट्राईक रेटने ३६८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने फलंदाजी करताना २ अर्धशतकेही साकारली आहेत. तसेच, त्याची सर्वोत्तम धावसंख्या ६१ ही आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईविरुद्ध का खेळला नाही कायरन पोलार्ड? मोठे कारण आले समोर
शर्माची जागा घेणार वर्मा? लवकरच ‘या’ खेळाडूच्या कपाळावर लागणार मुंबईच्या कर्णधारपदाचा ‘तिलक’