Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

IPL 2022। मुंबईविरुद्ध सीएसकेने उभारली आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात छोटी धावसंख्या, वाचा बातमी

IPL 2022। मुंबईविरुद्ध सीएसकेने उभारली आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात छोटी धावसंख्या, वाचा बातमी

May 12, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
MS-Dhoni

Photo Courtesy: iplt20.com


इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये निराशाजनक प्रदर्शन करणाऱ्या मुंबई इंडियन्सने गुरुवारी (१२ मे) मात्र सीएसेकेची चांगलीच दाणादाण उडवली. मुंबईच्या गोलंदाजी आक्रमणाने सीएसकेला अवघ्या ९७ धाावंवर गुंडाळले. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने ३६ धावा केल्या, जी संघासाठी सर्वात मोठी खेळी ठरली. दरम्यान, सीएसकेच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात लहान धावसंख्या ठरली आहे.

आयपीएल २०१३मध्ये सीएसकेने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एका सामन्यात अवघ्या ७९ धावा केल्या होत्या. ही त्यांची आतापर्यंतची सर्वात लहान धावसंख्या आहे. आता या यादीत गुरुवारी खेळला गेलेला सामना दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. मुंबईविरुद्धच्या या सामन्यात सीएसकेचा संपूर्ण संघ अवघ्या ९७ धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर या यादीत तिसऱ्या क्रमाकंवार सीएसके आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात २००८मध्ये खेळला गेलेला सामना आहे. या सामन्यात सीएसके अवघ्या १०९ धावा करून सर्वबाद झाला होता. यादीत चौथ्या क्रमांकावर २०१९मध्ये झालेला मुंबई विरुद्ध सीएसके सामना आहे. या सामन्यात देखील सीएसकेने १०९ धावा केल्या होत्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आयपीएलच्या इतिहासातील सीएसकेची सर्वात लहान धावसंख्या
७९ विरुद्ध मुंबई इंडियन्स – वानखेडे स्टेडियम (आयपीएल २०१३)
९७ विरुद्ध मुंबई इंडियन्स – वानखेडे स्टेडियम (आयपीएल २०२२)*
१०९ विरुद्ध राजस्थान रॉयल्स – जयपूर स्टेडियम (आयपीएल २००८)
१०९ विरुद्ध मुंबई इंडियन्स – चेपॉक स्टेडियम (आयपीएल २०१९)

दरम्यान, मुंबई आणि सीएसके यांच्यातील गुरुवारी खेळल्या गेलेल्या या सामन्याच विचार केला, तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी रोहिताचा हा निर्णय योग्य देखील ठरवला. सीएसकेला डावातील संपूर्ण २० षटके देखील खेळता आली नाहीत. १६ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्यांनी शेवटची विकेट गमावली.

मुंबईसाठी डॅनियल सॅम्सने १६ धावा खर्च करून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मागच्या सामन्यात ५ विकेट घेणारा जसप्रीत बुमराह या सामन्यात फक्त एक विकेट घेऊ शकला. रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच रमणदीप सिंगनेही एक विकेट घेतली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

चेन्नईविरुद्ध पहिली ओव्हर टाकताच बूम बूम बुमराहच्या नावावर खास विक्रमाची नोंद; थेट मलिंगाशी केली बरोबरी

काउंटी क्रिकेटमध्ये दिसला ‘डुप्लिकेट’ शेन वॉर्न; जबराट फिरकीने उडवल्या फलंदाजाच्या दांड्या

एक तीर, तीन निशाणे! वॉर्नरने झटक्यात विराट, डिविलियर्स अन् गेलला टाकले मागे, पाहा पठ्ठ्याचा कारनामा


ADVERTISEMENT
Next Post
Ishan Kishan and Rohit Sharma

'पुढच्या हंगामात सर्व ठीक होईल, चढ-उतार येत असतात', मुंबई इंडियन्सच्या सलामीवीराचा विश्वास

Rohit-Sharma-MS-Dhoni-MI-vs-CSK

मुंबई इंडियन्सचा 'धोनीसेने'विरुद्ध २० वा विजय! पाहा सीएसकेला सर्वाधिकवेळा कोणी केलय पराभूत

Ghorpadi-Tamil-United-tops-Group-C

राम स्पोर्टिंगवरील विजयाने घोरपडी तमिळ युनायटेड सी गटात अव्वल

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.