---Advertisement---

‘टी20 क्रिकेटमधून विराट अन् रोहितचा पत्ता कट करा…’, शास्त्रींचा बीसीसीआयला गजब सल्ला

On: सोमवार, मे 15, 2023 8:38 PM
Rohit-Sharma-And-Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल खळबळजनक भाष्य केले आहे. त्यांनी या दोघांसंदर्भात बीसीसीआईला मोठा सल्ला दिला आहे. यामध्ये ते म्हणालेत की, त्यांच्या मते विराट आणि रोहितला टी20 संघातून बाहेर काढले पाहिजे. आता सर्वत्र त्यांच्या वक्तव्याची एकच चर्चा रंगताना दिसत आहे. शास्त्रीच्या अशा वक्तव्यामागे कोणते कारण आहे, ते आपण जाणून घेऊयात…

काय म्हणाले शास्त्री?
भारतीय संघातील दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या टी20 संघातील स्थानाबाबत बरीच चर्चा होत आहे. सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांसारख्या युवा खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीग 2023 (Indian Premier League 2023) स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना टी20 संघात निवडले जाऊ शकते. मात्र, यासाठी विराट आणि रोहित यांनाही संधी देऊ इच्छितात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट आणि रोहितच्या संघातील स्थानावर मोठी टीका केली. ते म्हणाले की, “जर खेळाडू स्वत: संघातून बाहेर पडले नाहीत, तर त्यांची निवड त्यांच्या फॉर्मवरून होईल. आता टी20 क्रिकेटमधून विराट आणि रोहितच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे.”

विराट आणि रोहितला विश्रांतीची गरज
“सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण जिथे होते, तिथे आज विराट आणि रोहित आहेत. विराट आणि रोहितसारख्या खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केले आहे. या नवीन खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपले कौशल्य दाखवले आणि त्यांना एक संधी दिली जावी. भारतीय संघामध्ये नवीन खेळाडूंना घेताना सर्वोत्कृष्ट व्यक्तींची निवड कराल आणि मग अर्थातच अनुभवही मोजला जाईल, फिटनेसही मोजला जाईल,” असे शास्त्री यांनी माध्यमांना सांगितले.

शास्त्री पुढे बोलताना म्हणाले की, “विराट आणि रोहित आधीपासूनच संघातील खेळाडू आहेत. आता टी20 मालिकांमध्ये युवा खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, जे आयपीएल 2023मध्ये शानदार कामगिरी करत आहेत. तसेच, तुम्ही वनडे आणि कसोटी क्रिकेटसाठी विराट आणि रोहितला ताजेतवाने ठेवा.”

विश्वचषकाची भारताला गरज
शास्त्री यांनी पुढे असे मत व्यक्त केले की, “भारत जगातील सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय टी20 विश्वचषक सामना गेल्या 16 वर्षांपासून जिंकला नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये खेळला गेलेला टी20 विश्वचषक भारत उपांत्य सामन्यात पराभूत झाला होता. पुढील विश्वचषक 2024मध्ये खेळला जाणार आहे. मला असे वाटते की, एक वर्ष खूप लांब आहे. आत्ता खेळाडू फॉर्ममध्येही असू शकतात, काही वेळेला फॉर्म गायब देखील होऊ शकतो. त्यामुळे त्यावेळी जो कोणी तुम्हाला सर्वौत्कृष्ट वाटेल त्याला संघामध्ये घ्यावे लागेल, आणि हे करण्यासाठी नक्कीच अनुभव महत्वाचा आहे.”

आता टी20 क्रिकेटमध्ये रोहित आणि विराटच्या सहभागाबद्दल संघव्यवस्थापन काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (cricketer virat kohli and rohit sharma should play only tests and odis ravi shastri)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी गावसकरांनी भेदला सुरक्षा घेरा, पळत जाऊन मारली मिठी, पाहा संपूर्ण व्हिडिओ
IPL 2023मध्ये का घेतल्या नाहीत जास्त विकेट्स? दिग्गज नारायणने दिले ‘हे’ खळबळजनक उत्तर, वाचाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---