भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री तसेच त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांची जोडी रोमँटिक जोड्यांपैकी एक आहे. ही जोडी नेहमीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असते. कधी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करून, तर कधी एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करून. रविवारी (दि. 11 डिसेंबर) विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा 5वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने दोघांनीही फोटो शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशात त्यांच्या पोस्ट आणि कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
विराट कोहली इंस्टाग्राम पोस्ट
विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अनंत काळाच्या यात्रेवरील 5 वर्षे. तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी धन्य झालो आहे. मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो.” विराटने शेअर केलेल्या या फोटोत दोघेही मोकळ्या आकाशाखाली दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CmBQxE0vgcq/
विराटने शेअर केलेल्या या फोटोवर 2 तासातच 47 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 32 हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.
अनुष्का शर्मा इंस्टाग्राम पोस्ट
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिनेदेखील तिच्या इंस्टाग्रामवर विराटसोबतच्या खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, यातून तिने खास क्षण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिने विराटचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या प्रत्येक फोटोचे तिने वेगवेगळे महत्त्व सांगितले आहे. या फोटोंना कॅप्शन देत तिने लिहिले आहे की, “हे सुंदर फोटो शेअर करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस कोणता असेल ना? माझे प्रेम. मला माहित आहे की तू नेहमी माझ्या मागे उभा आहेस.”
https://www.instagram.com/p/CmBPRHfJaYp/
अनुष्काच्या पोस्टवर 2 तासातच 21 लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे. तसेच, 12 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे.
विराट आणि अनुष्काच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण
विराट कोहली आणि अनुष्काने 11 डिसेंबर, 2017 रोजी संसार थाटला होता. त्यांच्या लग्नाला आता 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच, मागील वर्षी जानेवारी महिन्यात ते दोघेही आई-वडील बनले होते. त्यांच्या मुलीचे नाव वामिका असे आहे. वामिका पुढील महिन्यात 11 जानेवारी, 2023 रोजी दोन वर्षांची होईल.
बांगलादेश दौऱ्यावर विराट कोहली
विराट कोहली सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. यामध्ये तो 14 डिसेंबरपासून यजमान संघाविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. विराट सध्या भलत्याच लयीत आहे. तसेच, बांगलादेशमध्ये त्याने शतक झळकावत आपले 72वे आंतरराष्ट्रीय शतकही साजरे केले आहे. अशात विराटकडून या मालिकेत चाहत्यांना आणि संघाला भरपूर अपेक्षा आहेत. (cricketer virat kohli anushka sharma celebrate 5th wedding anniversary see post)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिने 18, अध्यक्ष 4! ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये नक्की काय सुरूये?
किशनच्या प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा, बऱ्याच वर्षांआधी धोनीने व्यक्त केले होते मत
पुत्र व्हावा ऐसा गुंडा! ईशानच्या यशाने भारावले आई-वडील; म्हणाले…