विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. आयपीएल 2023 स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्स संघाने आरसीबीला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात झालेल्या पराभवाचे दु:ख मनातच दाबून विराटने त्याच्या विरोधी संघाच्या खेळाडूंचे कौतुक केले. तसेच, सामना संपल्यानंतर जेव्हा राशिद खान त्याच्याकडे आला, तेव्हा विराटने त्याची गळाभेट घेतली आणि त्याला ऑटोग्राफही दिला.
विराट कोहलीने राशिद खानला दिला ऑटोग्राफ
विराट कोहली (Virat Kohli) याने राशिद खान (Rashid Khan) याला जर्सीवर ऑटोग्राफ दिला. त्यांच्यात बराच वेळ चर्चाही झाली. खरं तर, विराटने या सामन्यात 61 चेंडूंचा सामना करताना नाबाद 101 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 13 चौकारांचाही समावेश होता. हे विराटचे आयपीएल 2023मधील सलग दुसरे शतक होते. त्याच्या या शतकाच्या जोरावर आरसीबी संघाने 5 विकेट्स गमावत 197 धावा केल्या होत्या. मात्र, त्यांच्या या मेहनतीवर गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर शुबमन गिल यानेही सलग दुसरे शतक ठोकत पाणी फेरले. गिलने या सामन्यात 52 चेंडूत 104 धावा केल्या. यामध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.
Some memorable souvenirs for players and a lap of honour for the ever-so-energetic Chinnaswamy crowd 👏🏻👏🏻#TATAIPL | #RCBvGT | @RCBTweets pic.twitter.com/Y8dQzz2QyP
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2023
पहिली विकेट लवकर पडल्यानंतर गिल आणि इम्पॅक्ट प्लेअर विजय शंकर (35 चेंडूत 53 धावा) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी झाली होती. याच जोरावर गुजरातने सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर गिल शेवटपर्यंत टिकून राहिला आणि त्याने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीच्या या पराभवामुळे मुंबईला मोठा फायदा झाला. मुंबई प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ बनला.
विराटची झुंज अपयशी
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये पावसामुळे सामना एक तास उशिरा सुरू झाला. या सामन्यता गुजरातने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी आरसीबीने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 62 धावा केल्या होत्या. मात्र, यानंतर पुढच्या तीन षटकात त्यांचा डाव ढासळला. सलग विकेट पडत राहिले, पण विराट टिकून राहिला आणि त्याने टिच्चून फलंदाजी केली. सहाव्या विकेटसाठी विराट आणि अनुज रावत यांच्यात नाबाद 64 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे संघ कठीण स्थितीतून वर आला. मात्र, आरसीबीसाठी विराटने जे केले, तेच गुजरातसाठी गिलने करून संघाला विजयी केले. (cricketer virat kohli gives autograph rashid khan after out from ipl playoff 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिलच्या विजयी षटकारामुळे मुंबई प्ले-ऑफ्समध्ये, RCB हारताच ‘पलटण’च्या खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल
WTC फायनलपूर्वीच विराटबाबत धक्कादायक ब्रेकिंग! गुडघ्याच्या दुखापतीवर आरसीबीचा कोच म्हणाला…