भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली अर्धशतक करण्यापासून हुकला. यावेळी विराट 44 धावांवर पायचीत बाद झाला. मात्र, विराटच्या विकेटविषयी खूपच गोंधळ निर्माण झाला आहे. खरं तर, जेव्हा पंचांनी विराटला पायचीत बाद दिले, तेव्हा त्याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तिसऱ्या पंचांनी टीव्ही रिप्लेमध्ये अनेकदा पाहिल्यानंतरही निर्णय देत विराटला बाद घोषित केले. मात्र, पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे विराट निराश दिसला. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
टीव्ही रिप्लेमध्ये हे स्पष्ट समजत नव्हते की, चेंडू आधी पॅडला लागला आहे की, बॅटला. त्यामुळे उडालेल्या गोंधळामध्ये तिसऱ्या पंचांनी विराट कोहली (Virat Kohli) बाद असल्याचे घोषित केले. इतकेच नाही, तर हॉक-आयमधून असे दिसत होते की, चेंडू लेग स्टंपच्या बाहेरील बाजूस लागत आहे. मात्र, पंचांनी निर्णय गोलंदाजाच्या बाजूने दिला.
अशात विराट पुन्हा पव्हेलियनमध्ये जातानाही हैराण दिसला. इतकेच नाही, तर जेव्हा विराट पव्हेलियनमध्ये गेला, तेव्हा भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासोबत बोलताना दिसला. विराटला पाहून असे वाटत होते की, तो निराश आहे. तसेच, सोशल मीडियावरही चाहते सातत्याने पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ट्वीट करत आहेत.
Virat Kohli wicket rewatch ???? It's clearly pad first ????#INDvAUS pic.twitter.com/cxKf0FTAcB
— ????Ⓐ???????????????? 1⃣5⃣ (@katthikathir) February 18, 2023
https://twitter.com/WaleedKhanYz/status/1626851614639247360
Virat Kohli was clearly unhappy watching his wicket's replay in the dressing room. pic.twitter.com/ly4kWbwawY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 18, 2023
Unlucky Virat Kohli. pic.twitter.com/W0MzaprUUy
— Johns. (@CricCrazyJohns) February 18, 2023
Virat Kohli seems unhappy and disappointed with the Umpire's decision. pic.twitter.com/gNARxrj4zB
— Pari (@BluntIndianGal) February 18, 2023
Batting coach Vikram Rathore and coach Rahul Dravid looks unhappy with the umpires with their decision on Virat Kohli. pic.twitter.com/Gd7P884uCK
— Tanuj Singh (@ImTanujSingh) February 18, 2023
Virat Kohli looks unhappy on Umpire controversial LBW decision.#NitinMenon #INDvsAUS pic.twitter.com/deQ6nvuzmx
— Abdullah Neaz (@cric___guy) February 18, 2023
विक्रमासाठी आणखी एका कसोटी डावाची पाहावी लागेल वाट
विराट कोहली याने दिल्ली कसोटी (Delhi Test) सामन्यात भारताच्या पहिल्या डावात 44 धावा केल्या. त्यामुळे त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत 25 हजार धावा करण्यासाठी फक्त 8 धावांची गरज आहे. अशात त्याला आणखी एका कसोटी डावाची वाट पाहावी लागेल.
अशी कामगिरी करणारा बनेल दुसरा भारतीय
विराटने पुढील कसोटी डावात 8 धावा केल्या, तर तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजारांहून अधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनेल. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून 25 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 34,357 धावा करण्याचा विश्वविक्रम आहे.
सचिनने 664 सामन्यात 782 डावांमध्ये फलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांसोबत 34,357 धावा केल्या आहेत. या बाबतीत दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकारा आहे. त्याने 28,016 धावा केल्या आहेत. तसेच, रिकी पाँटिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,483 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त माहेला जयवर्धने याने 25,957 आणि जॅक कॅलिस याने 25,534 धावा केल्या आहेत. (cricketer virat kohli looks unhappy on umpire controversial lbw decision 2nd test match of ind vs aus)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जबरदस्त! जिमी अन् ब्रॉडचा जागतिक क्रिकेटमध्ये राडा, मोडला वॉर्न-मॅकग्रा जोडीचा ‘तो’ World Record
पुन्हा नंबर 18! WPL च्या पहिल्या हंगामात स्मृती करणार आरसीबीचे नेतृत्व, विराटने केली घोषणा






