भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याची गणना जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये होते. विराटला फक्त भारतातच नाही, तर जगभरात मोठा चाहतावर्ग लाभला आहे. क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडणारा विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक संपत्ती असणारा क्रिकेटपटू आहे. तो वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. आज या लेखातून आपण त्याच्या संपत्तीविषयी जाणून घेऊयात…
विराटकडे 1000हून अधिक कोटींची संपत्ती
विराट कोहली (Virat Kohli) हा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील आहे. विराट फक्त क्रिकेटमधूनच नाही, तर स्टार्ट-अप, सोशल मीडिया प्रति पोस्ट, ब्रँड एम्बेसेडर आणि जाहिरातींमधूनही बक्कळ कमाई करतो. त्याच्याकडे सध्याच्या घडीला 1050 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
क्रिकेटमधून कमावतो इतका पैसा
भारतीय स्टार फलंदाज विराटला बीसीसीआय करारांतर्गत अ+ श्रेणीच्या रूपात पगार मिळतो. त्याला बीसीसीआयकडून वर्षाकाठी 7 कोटी रुपये मिळतात. याव्यतिरिक्त प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, वनडे सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. तसेच, विराट आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून वर्षाकाठी 15 कोटी रुपये घेतो.
स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक आणि मालक
विराटने 7 स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे. या स्टार्ट-अपमध्ये ब्लू ट्राईब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिज, एमपीएल आणि स्पोर्ट्स कॉन्वो यांचा समावेश आहे. या सर्व स्टार्ट-अपमध्ये विराटने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक करण्याव्यतिरिक्त विराटने स्वत:च्या पाच स्टार्ट-अप कंपन्या सुरू केल्या आहेत. त्यामध्ये वन-2 रेस्टॉरंट, न्यूएवा डायनिंग बार आणि रेस्टॉरंट, वन-8, स्टेपथलोन यांचाही समावेश आहे.
तब्बल 110हून अधिक कोटींची प्रॉपर्टी आणि 31 कोटींच्या गाड्या
विराट कोहली याच्याकडे 110हून अधिक कोटींची प्रॉपर्टी आहे. त्यात मुंबईतील 34 कोटींच्या आणि गुडगाव येथील 80 कोटी किंमतीच्या घरांचा समावेश आहे. तसेच, विराटकडे 31 कोटी रुपयांच्या गाड्याही आहेत. विराट ऑडी या कार कंपनीचा ब्रँड एम्बेसेडर आहे. या कंपनीच्या विराटकडे आर8 व्ही10 प्लस, आर8 एलएमएक्स, ए8 एल, क्यू8, क्यू7, आरएस5 आणि एस5 अशा 7 गाड्या आहेत. याव्यतिरिक्त त्याच्याकडे, फॉर्च्युनर, रेंज रोव्हर आणि बेंटली या कंपनीची गाड्याही आहेत.
सर्वाधिक ब्रँड फी
आशियामध्ये विराट आज बॉलिवूड आणि क्रीडाक्षेत्रात सर्वाधिक ब्रँड फी घेणारा खेळाडू आहे. तो प्रत्येक ऍड शूटसाठी एका दिवसाचे 7.50 ते 10 कोटी रुपये फी घेतो. वृत्तांनुसार, ही फी दिवसाच्या हिशोबाने असते. जर शूटिंग पुढच्या दिवसावर ढकलली, तर फी दुप्पट होते. विराटकडे सध्या एकूण 26 ब्रँड्स आहेत. यामध्ये व्हिवो, ब्लूस्टार, लक्सर, एचएसबीसी, उबर, थूथसी, स्टार स्पोर्ट्स, एमआरएफ आणि सिंथॉल यांसारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे.
जाहिरातीतून 175 कोटींची कमाई
विराट कोहली फक्त जाहिरातीतूनच वर्षाकाठी जवळपास 175 कोटी रुपयांची कमाई करतो. याव्यतिरिक्त तो इंस्टाग्रामवरून प्रत्येक पोस्टसाठी 8.9 कोटी, तर ट्विटरवरून 2.5 कोटी रुपये घेतो. विराट एफसी गोवा फुटबॉल क्लब, एक टेनिस संघ आणि प्रो-रेसलिंग संघाचाही मालक आहे. (cricketer virat kohli net worth is over rs 1000 crore see details)
महत्वाच्या बातम्या-
बापलेकीचं प्रेम! शतक ठोकल्यानंतर मुलीला थेट पत्रकार परिषदेत घेऊन पोहोचला ख्वाजा, पुढे काय झालं पाहाच
‘…माझी शेवटची मालिका ठरू शकते’, अश्विनने पत्नीला सांगितलेल्या मनातल्या वेदना; स्पिनरचा मोठा खुलासा





