---Advertisement---

सामनावीर बनताच टीकाकारांवर बरसला ‘किंग’ कोहली; म्हणाला, ‘कुणालाही चुकीचे…’

Virat-Kohli-Statement
---Advertisement---

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या चौथ्या कसोटीत चौथ्या दिवशी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने वादळी खेळी साकारली. त्याच्या खेळीमुळे भारताला मोठी आघाडी घेण्यात यश आले. या सामन्यात विराट कोहली याने तब्बल 1205 दिवसांनंतर शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला. हा चौथा सामना अनिर्णित ठरला, पण भारताने मालिका 2-1ने खिशात घातली. या सामन्यानंतर विराटने टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

विशेष म्हणजे, या मालिकेपूर्वी विराट कोहली (Virat Kohli) याने खेळलेल्या 15 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नव्हते. त्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र, चौथ्या कसोटीत त्याने 364 चेंडूत 186 धावा चोपल्या. यामध्ये 15 चौकारांचाही समावेश होता. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर विराटने त्याच्या खेळाबाबत आणि टीकाकारांबाबत परखड मत मांडले आहे.

https://twitter.com/BCCI/status/1635233313345654784

काय म्हणाला विराट?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात अहमदाबाद येथे चौथ्या कसोटीत विराटने वादळी दीडशतक ठोकत टीकाकारांची बोलती बंद केली. त्याने सामना अनिर्णित झाल्यानंतर भाष्य केले. तो म्हणाला की, “मला स्वत:कडून खूप जास्त आशांची गरज आहे. मी काही काळापासून माझ्या मनाप्रमाणे खेळलो नाही. मी काही चांगल्या खेळीही साकारल्या होत्या. कल्पना होती की, दीर्घ काळापर्यंत खेळले जाईल, पण हाही विश्वास होता की, चांगल्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारू शकेल. मी माझ्या पद्धतीने खेळलो, यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या अर्थाने मोठी कामगिरी केल्याचा दिलासा नव्हता.”

पुढे बोलताना विराट म्हणाला की, “मला वाटत नाही की, मला कुणालाही चुकीचे सिद्ध करायचे आहे. मी आनंदी होतो की, मी संघासाठी मोठी खेळी खेळलो. आम्ही तिसऱ्या दिवशी सकारात्मक खेळण्याचे बोललो होतो. मात्र, जेव्हा श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला, तेव्हा योजना जरा बदलली. आम्हाला त्यानंतर ऑस्ट्रेलियाला मैदानावर दीर्घकाळ ठेवायचे होते, आणि हीच आमच्यासाठी मोठी कामगिरी होती.”

अहमदाबाद कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या खेळात विराटने शानदार शतक ठोकले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 28वे शतक होते. विराटने 3 वर्षे, 3 महिने आणि 20 दिवसांनंतर कसोटी शतकांचा दुष्काळ संपवला. यापूर्वी विराटने शेवटचे शतक 2019मध्ये बांगलादेशविरुद्ध ठोकले होते. (cricketer virat kohli player of the match ind vs aus 4th test match read what he said)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मालिकावीर पुरस्काराच्या 2.5 लाखांची अश्विन-जडेजाने केली चुकीची वाटणी? व्हिडिओ जोरदार व्हायरल
टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, दोन बदलांसह मैदानात उतरणार राजधानी; RCB पहिल्या विजयासाठी सज्ज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---