Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही दोस्ती तुटायची नाय! BGT मालिका विजयानंतर रोहितकडून विराटचे कौतुक; म्हणाला, ‘आम्ही त्याच्यामुळेच…’

ही दोस्ती तुटायची नाय! BGT मालिका विजयानंतर रोहितकडून विराटचे कौतुक; म्हणाला, 'आम्ही त्याच्यामुळेच...'

March 13, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit-Sharma-And-Virat-Kohli

Photo Courtesy: bcci.tv


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (दि. 13 मार्च) संपुष्टात आला. हा सामना अनिर्णित राहिला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ही मालिका 2-1ने खिशात घातली. अशाप्रकारे भारताने चौथ्यांदा प्रतिष्ठित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. मात्र, चौथ्या कसोटीचा निकाल लागला नाही, अशात पाचव्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. मालिका नावावर केल्यानंतर रोहितने संपूर्ण खेळाडूंचे गुणगान गायले. मात्र, विराट कोहली याचे कौतुक खास ठरले. चला तर विराटविषयी रोहित काय म्हणाला हे जाणून घेऊयात…

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) जिंकल्यानंतर भलताच आनंदात दिसला. त्याने विजयानंतर म्हटले की, “ही एक शानदार मालिका होती. सुरुवातीपासूनच आम्हाला खूप मजा येत होती. आमच्या खेळाडूंसोबतच चाहत्यांनीही याचा पूर्ण आनंद घेतला. ही एक महत्त्वाची मालिका होती. आमच्यापुढे अनेक आव्हाने होती, जिथे आम्ही धैर्याने उभे राहिलो. आम्हाला या मालिकेची सुरुवात विजयाने करायची होती आणि आम्ही तसेच केले.”

For his calm, composed and patient century in the final Test, Virat Kohli – our Player of the Match 🔝#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/tfFftZ8HO5

— BCCI (@BCCI) March 13, 2023

रोहित शर्माने केले विराटचे कौतुक
रोहितने यावेळी विराट कोहली (Virat Kohli) याच्या वादळी खेळीचे कौतुकही केले. तो म्हणाला की, “विराटने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते पाहून मी खूप खुश आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, तो कशाप्रकारचा खेळाडू आहे आणि आपल्याला माहितीये की, त्याने पांढऱ्या आणि लाल चेंडूने काही शतकेही ठोकली आहेत.” विराटविषयी बोलताना रोहित असेही म्हणाला की, “चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत राहण्यामागील मोठे कारण विराट कोहली स्वत: होता.”

विराटची चौथ्या कसोटीतील वादळी खेळी
ऑस्ट्रेलियाच्या 480 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचे काम विराट कोहली याने केले. त्याने शेवटपर्यंत झुंज दिली. विराटने चौथ्या कसोटीत 364 चेंडूंचा सामना करताना 186 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 15 चौकारांची बरसातही केली. विशेष म्हणजे, या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. हा त्याचा कसोटी कारकीर्दीतील 10वा सामनावीर पुरस्कार होता. (after won border-gavaskar trophy rohit sharma praised virat kohli read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसह खास पुरस्कारांवर भारतीयांचेच नाव; विराट सामनावीर, तर ‘हे’ दोघे बनले मालिकावीर
आख्ख्या BGT मालिकेत चमकले फक्त 4 स्पिनर, पहिला नंबर गाजवला ‘या’ भारतीयाने


Next Post
R-Ashwin-And-Ravindra-Jadeja

'आम्ही एकमेकांशिवाय अपूर्ण...', मालिकावीर अश्विन-जड्डूने गायले एकमेकांचे गुणगान, तुम्हीही कराल कौतुक

Virat Kohli

अशी कामगिरी करणारा विराट पहिलाच, विक्रम जाणून वाढेल तुमच्याही मनातील आदर

Meg-Lanning-And-Smriti-Mandhana

टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, दोन बदलांसह मैदानात उतरणार राजधानी; RCB पहिल्या विजयासाठी सज्ज

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143