Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘माझ्यासाठी वैयक्तिक विक्रम महत्वाचे नाहीत’, मालिका विजयानंतर कर्णधार रोहितचे मन जिंकणारे विधान

'माझ्यासाठी वैयक्तिक विक्रम महत्वाचे नाहीत', मालिका विजयानंतर कर्णधार रोहितचे मन जिंकणारे विधान

March 13, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit Sharma

Photo Courtesy: bcci.tv


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी सोमवारी संपली. मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारताने ही कसोटी मालिका 2-1 अशा अंतराने जिंकली आणि ट्रॉफी आपल्याकडे कायम राखली. शेवटच्या कसोटीत खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने सामना निकाली निघू शकला नाही. सामना संपल्यानंतर रोहितने खास प्रतिक्रिया दिली.

भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 480 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात बारताने 571 धावांचा डोंगर उभा केला. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने त्यांच्या दुसऱ्या डावात 2 बाद 171 धावा केल्या आणि दोन्ही कर्णधारांनी एकमताने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना संपन्न झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा () याने माध्यमांसमोर खास प्रतिक्रिया दिली. रोहितच्या मते यावर्षीची बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारतीय संघासाठी अप्रतिम होती.

माध्यमांसमोर रोहित म्हणाला, “या मालिकेत अनेक खेलाडू पहिल्यांदाच कसोटी मालिकेचा भाग होते. आम्हाला या मालिकेचे महत्व आणि विरोधी संघाविषयी माहिती होती. मालिका जिंकण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेतले आहेत. मालिका सुरू होण्याआधीपासूनच आम्हाला याचे महत्व ठाऊक होते. संघ केवळ2-3 खेळाडूंवर अवलंबून राहिला नाही. संघातील अनेक खेळाडूंनी चांगले योगदान दिले.” रोहित पुढे असेही म्हणाला की, “वैयक्तिक विक्रम माझ्यायासाठी जास्त महत्वाचे नाहीत. पण आम्ही मालिका नावावर केली, जे खापूच खास आहे.”

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर एकूण चार खेळाडूंनी शतकीय खेळी केली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजा याने 180, तर कॅमरून ग्रीन याने 114 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात पहिल्याच डावात भारतासाठी विराट कोहली 186, तर शुबमन गिल 128 धावा करू शकला. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचे पहिल्या डावाती प्रदर्शन देखील कौतुकास पात्र होते. अश्विनने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली.
(‘Personal records are not important to me’, captain Rohit’s heart-wrenching statement after the series win)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा भारतात कसोटी खेळायला येणार का? स्मिथने उत्तरातच दिले भविष्याचे संकेत
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ‘या’ फलंदाजांचा राहिला बोलबाला! ख्वाजा टॉपर, ‘हे’ भारतीयही यादीत


Next Post
Rohit-Sharma-And-Virat-Kohli

ही दोस्ती तुटायची नाय! BGT मालिका विजयानंतर रोहितकडून विराटचे कौतुक; म्हणाला, 'आम्ही त्याच्यामुळेच...'

R-Ashwin-And-Ravindra-Jadeja

'आम्ही एकमेकांशिवाय अपूर्ण...', मालिकावीर अश्विन-जड्डूने गायले एकमेकांचे गुणगान, तुम्हीही कराल कौतुक

Virat Kohli

अशी कामगिरी करणारा विराट पहिलाच, विक्रम जाणून वाढेल तुमच्याही मनातील आदर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143