सध्या यूएसएमध्ये मेजर लीग क्रिकेट म्हणजेच एमएलसी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात रोमांचित करणाऱ्या घटना घडत आहेत. आता अशीच एक घटना समोर येत आहे, ज्यात विराट कोहलीचा संघसहकारी फिन ऍलेन याने सोप्या चेंडूवर आपली विकेट गमावली आहे. यावेळी त्याने घेतलेल्या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट 2023 (Major League Cricket 2023) स्पर्धेतील चौथ्या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध सिएटल ऑर्कस (San Francisco Unicorns vs Seattle Orcas) संघ आमने-सामने होते. या सामन्यात सिएटल संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्स गमावत 177 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या युनिकॉर्न्स संघाला 17.5 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 142 धावाच करता आल्या. त्यामुळे सिएटल संघाने हा सामना 35 धावांनी जिंकला.
नेमकं काय झालं?
यादरम्यान युनिकॉर्न्स संघाकडून फलंदाजी करताना सलामीवीर फिन ऍलेन (Finn Allen) पहिल्या 2 षटकांनंतर 3 चेंडूत 6 धावांवर खेळत होता. त्याने वेन पार्नेल हा गोलंदाज टाकत असलेल्या तिसऱ्या षटकात एकूण 28 धावा कुटल्या. यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. मात्र, कॅमेरून गॅनन टाकत असलेल्या चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ऍलेनने आपली विकेट गमावली. झालं असं की, गॅननचा चेंडू ऍलेनने खेळला आणि तो खूपच आरामात धावत दुसऱ्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी क्षेत्ररक्षकाने लगेच चेंडू उचलला आणि स्टम्पवर मारला. त्याला असे करताना पाहून ऍलेनने जोरात धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची बॅट खेळपट्टीवर अडकली आणि सोप्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. यावेळी ऍलेन ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
WHAT JUST HAPPENED⁉️
Was this the only way Finn Allen could get out tonight?
HEADS-UP play and a BEAUTIFUL throw from Shehan Jayasuriya!
4⃣2⃣/1⃣ (3.2) pic.twitter.com/GZk5bkYG4Q
— Major League Cricket (@MLCricket) July 16, 2023
this is not my Unicorn cricket. pic.twitter.com/VtAnO74Ha7
— Jomboy (@Jomboy_) July 16, 2023
विराटचा संघसहकारी आहे ऍलेन
फिन ऍलेन हा एमएलसी स्पर्धेत सॅन फ्रान्सिस्को संघाकडून खेळत आहे. ऍलेन न्यूझीलंडचा फलंदाज असून तो आयपीएलमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचाही भाग राहिला आहे. ऍलेन याने या सामन्यात 9 चेंडूत 28 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे. (cricketer virat kohli team player fin allen out on simple ball in major league cricket see video)
महत्वाच्या बातम्या-
काळीज तोडणारी बातमी! 20 वर्षीय मुलाचे क्रिकेट खेळताना निधन, हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
बांगलादेश पुढे अफगाणिस्तानचे लोटांगण! सलग दुसऱ्या विजयासह केली टी20 मालिका नावे