भारतात जेव्हा परदेशातील खेळाडू कसोटी सामने खेळण्यासाठी येतात तेव्हा त्यांच्यावर जगभरातील माध्यमांचे विशेष लक्ष असते. भारतात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूचे जगभरात कौतूक होते. भारतात चांगली कामगिरी केल्यानंतर खेळाडूला संघातील जागा पक्की करण्यासाठीही मदत होते.
परंतु काही क्रिकेटपटू असेही आहे जे संपुर्ण जगात यशस्वी ठरले, कसोटी कारकिर्दीत त्यांनी खोऱ्याने धावा केल्या आहेत परंतु त्यांना भारतात कसोटीत मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. Cricketers with worst batting records in Test in India.
५. सलीम मलिक
पाकिस्तानचे माजी फलंदाज राहिलेल्या सलीम मलिक यांनी कसोटीत १०३ सामन्यात ४३.६९च्या सरासरीने ५७६८ धावा केल्या. भारतात ते १९८३ ते १९९९ या काळात १० कसोटी सामने खेळले परंतु त्यांनी केवळ १९.१३च्या सरासरीने २८७ धावा केल्या. त्यांना भारतात १८ डावात साधं अर्धशतकही करता आले नाही. ३३ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या राहिली.
४. अर्जुन रणतुंगा
श्रीलंकेचा महान कर्णधार अर्जुन रणतुंगाने कसोटीत ९३ कसोटी सामन्यात ३५.६९च्या सरासरीने ५१०५ धावा केल्या. यात त्याने भारतात ११ कसोटीत २०.२१च्या सरासरीने ३८४ धावा केल्या. यात त्याने २ अर्धशतके केली. ५९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली.
३. डेसमाॅंड हायेन्स
जगातील एक मोठे वनडे खेळाडू म्हणून ओळख असलेल्या डेसमाॅंड हायेन्स यांनी कारकिर्दीत ११६ कसोटी सामन्यात ४२.२९च्या सरासरीने ७४८७ धावा केल्या. १९८३ ते १९८८ या काळात ते भारतात १० कसोटी सामने खेळले परंतु यात त्यांनी २२.१७च्या सरासरीने केवळ ३७७ धावा केल्या. ५८ या त्यांच्या सर्वोच्च धावा राहिल्या असून यात त्यांनी केवळ २ अर्धशतके केली.
२. अरविंद डिसिल्वा
श्रीलंकेचा महान कर्णधार राहिलेल्या अरविंद डिसिल्वाने कसोटी कारकिर्दीत एकूण ९३ कसोटीत ४२.९७च्या सरासरीने ६३६१ धावा केल्या. भारतात त्याने १९८६ ते १९९७ या काळात १० कसोटी सामन्यात २५.१८च्या सरासरीने जेमतेम ४०३ धावा केल्या. यात त्याने एक शतक व एक अर्धशतक केले. या दोन खेळी जर काढल्या तर त्याने बाकी ९ सामन्यात जेमतेम २२०-३० धावा केल्या आहेत.
१. रिकी पाॅटींग
ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाॅटींगने कसोटी कारकिर्दीत १६८ सामन्यात ५१.८५च्या सरासरीने १३३७८ धावा केल्या आहेत. भारतात रिकी पाॅटींगने १९९६ ते २०१० या काळात १४ कसोटी सामन्यात २६.४८च्या सरासरीने ६६२ धावा केल्या आहेत. त्यात त्याने १ शतक व ५ अर्धशतके केली आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रिकी पाॅटींगने तब्बल ४८ सामने जिंकले आहेत. पाॅटींग कसोटीतील एक मोठा कर्णधार समजला जातो. परंतु जगभरात ४८ कसोटी सामने जिंकणाऱ्या पंटरला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. भारतात त्याने कर्णधार म्हणून ७ सामने खेळले व त्यात त्याने ५ पराभव पाहिले व २ सामने अनिर्णित राहिले. त्याला फलंदाजीतही कसोटी क्रिकेटमध्ये भारतात विशेष यश मिळाले नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
–एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज
-२००७ विश्वचषकातील हिरो म्हणतोय यावेळीचा टी२० विश्वचषक खेळणारचं