भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत हंगाम येत्या 28 जूनपासून सुरू होणार आहे. या हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून होणार आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंचा भरणा आहे. मात्र, भारतीय यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे. यामागील कारण वाचून प्रत्येकजण त्याची वाहवा केल्याशिवाय राहणार नाही. चला तर, साहाने दुलीप ट्रॉफी सोडण्यामागील कारण जाणून घेऊयात…
माध्यमांतील वृत्तांनुसार, ईस्ट झोन यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) याने दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. कारण, तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तो कसोटी संघाचा भाग असेल. अशात तो या स्पर्धेतुून बाहेर पडला आहे. त्यामुळे निवडकर्त्यांनी वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्याने या स्पर्धेत खेळण्यास स्पष्ट नकार दिला. यासोबतच त्याने कारणही सांगितले.
वृत्तांनुसार, साहा म्हणाला की, “दुलीप ट्रॉफी भारताच्या पुढच्या युवा खेळाडूंसाठी आशा आहे. जर मी भारतासाठी कधी खेळणार नाही, तर कोणत्याही युवा खेळाडूला आपली दावेदारी ठोकण्यापासून रोखण्यात काहीच अर्थ नाहीये.” त्यामुळे निवडकर्त्यांनी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून अभिषेक पोरेल याची निवड केली, जी त्यांची तिसरी पसंत ठरली.
साहाची कारकीर्द
साहाने भारतीय संघाकडून 40 कसोटी आणि 9 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 29.41च्या सरासरीने 1353 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश होता. याव्यतिरिक्त वनडेत त्याने फक्त 41 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त तो नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023 हंगामातही शानदार फॉर्ममध्ये होता. त्याने गुजरात टायटन्स संघाकडून 17 सामने खेळताना 23.19च्या सरासरीने 2 अर्धशतकासह 371 धावा केल्या होत्या. (cricketer wriddhiman saha decided not to play in the duleep trophy as he does not want to take the spot of a youngster)
ईस्ट झोन संघ
अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), शांतनू मिश्रा, सुदीप घरामी, रियान पराग, ए मजूमदार, बिपिन सौरभ, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), के कुशाग्र (यष्टीरक्षक), एस नदीम (उपर्णधार), शाहबाज अहमद, मुकेश कुमार, आकाश दीप, अनुकुल रॉय, एम मुरा सिंह, ईशान पोरेल
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा