भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने शनिवारी (१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीबाबत माजी अष्टपैलू युवराज सिंगने एक शानदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमार्फत युवराज सिंगने धोनी मानवंदना दिली आहे. युवराजने या व्हिडिओला बॉलिवूडमधील ‘यू ही चला चल राही’ या गाण्याची जोड दिली आहे.
युवराजने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून लिहिले, “एका जबरदस्त कारकिर्दीसाठी धोनीला शुभेच्छा! २००७ आणि २०११ च्या विश्वचषकाचे विजेतेपद आपल्या देशासाठी आपण एकत्र उंचावले. याव्यतिरिक्त मैदानात आपल्यात अनेक भागीदारी झाल्या. तुझ्या पुढील कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा!”
युवराज सिंग आणि एमएस धोनीच्या भागीदारीने अनेक सामने भारताला दिले जिंकून
युवराजने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. युवराज आणि धोनीने एकत्र मिळून अनेक सामने भारतीय संघाला आपल्या कारकिर्दीत जिंकून दिले. या दोन्ही फलंदाजांमध्ये अनेक मोठ्या भागीदारी झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी युवराजने धोनीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले होते आणि म्हटले होते की, धोनीने मला निवृत्ती घेण्यात मदत केली होती. युवराजने म्हटले होते की, धोनीने त्याला सांगितले होते की २०१९ विश्वचषकात माझी निवड नाही केली. युवराजने पुढे म्हटले की, धोनीकडून मला समजले की निवडकर्ता माझ्या नावाबाबत विचार करणार नाहीत. यानंतर युवराजने सेंड ऑफ सामन्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1295015208872587264
मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभव मिळाला. तेव्हापासून धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आता धोनी १९ सप्टेंबरपासून यूएईत होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-निवृत्तीबाबत रैनाचे संपूर्ण स्टेटमेंट आले समोर; वाचा- काय काय म्हणालाय
-निवृत्ती घेतल्यानंतर धोनी पहिल्यांदाच घेणार हातात बॅट, या दिवशी खेळणार पहिली मॅच
-धोनीचं पक्क ठरलंय! निवृत्तीनंतर करणार पहिलं हे काम
ट्रेंडिंग लेख-
-कोरोनामुळे निधन झालेल्या भारताच्या पहिल्या ‘वॉल’ बद्दल फारशा माहिती नसलेल्या १० गोष्टी
-लॉकडाऊनमध्ये ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना मिळाल्या त्यांच्या जीवनसंगिनी
-धोनी- रैनाप्रमाणे फेअरवेलची मॅच न खेळताच क्रिकेटला राम राम ठोकणारे ५ भारतीय दिग्गज