---Advertisement---

निवृत्तीबाबत रैनाचे संपूर्ण स्टेटमेंट आले समोर; वाचा- काय काय म्हणालाय

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने शनिवारी (१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर काही वेळातच रैनानेही निवृत्ती घेतली होती.

रैनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले की, ”माही, तुझ्यासोबत खेळाने हा एक चांगला प्रवास होता. अतिशय अभिमानाने मी तुझ्यासोबत माझ्याही निवृत्तीची घोषणा करत आहे.”

https://www.instagram.com/p/CD6d3QChY-V/?utm_source=ig_web_copy_link

निवृत्तीबाबत रैनाचे वक्तव्य

धोनीपाठोपाठ निवृत्ती घेणाऱ्या रैनाच्या निवृत्तीचे संपूर्ण स्टेटमेंट समोर आले आहे.

रैनाने लिहिले की, “खूप साऱ्या मिश्र भावनांसोबत आपल्या निवृत्तीची घोषणा करतो. भारतीय संघात स्थान मिळविण्यापूर्वी लहानपणी मी माझ्या गावातील प्रत्येक गल्ली आणि चहाच्या टपरीवर क्रिकेटला अनुभवलंय. मी क्रिकेटला खूप जवळून ओळखले आहे आणि हे माझ्या नसानसांत धावत आहे. असा एकही दिवस नाही, जेव्हा देवाने आणि लोकांनी दिलेले प्रेम किंवा आशीर्वाद माझ्या आठवणीत राहिला नसेल.”

“मला तो आशीर्वाद व्यर्थ जाऊ द्यायचा नाही तसेच खेळ, आपला देश आणि जो कोणी माझ्या या प्रवासात माझ्या सोबत होते, त्यांना सर्वकाही परत द्यायचे होते. माझ्यावर अनेकवेळा शस्रक्रिया झाली, अनेक निराशादायी क्षणही माझ्या आयुष्यात आले. परंतु मी कधीही चुकीचं पाऊल उचललं नाही. लोकांच्या आधाराशिवाय मी यातून जाऊ शकलो नसतो. माझे आई-वडील, पत्नी प्रियंका, माझी मुलं ग्रेसिया आणि रियो, माझे भाऊ, बहिणी आणि सर्व कुटुंब सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय माझा हा प्रवास पूर्ण होऊ शकला नसता,” असेही रैना पुढे म्हणाला.

रैना पुढे म्हणाला की, माझ्या प्रशिक्षकाने नेहमीच मला योग्य दिशा दाखविली. फिजिओ, ट्रेनर या सर्वांनी माझी खूप मदत केली. भारतीय संघाच्या खेळाडूंनीही मला पाठिंबा दिला. मला भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली. मला राहुल भाई, अनिल भाई, सचिन भाई, चीकू आणि विशेष म्हणजे माही भाई यांसारख्या दिग्गज कर्णधारांच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली. माही भाईने मला एक मित्र आणि गुरूप्रमाणे मार्गदर्शन केले.

रैनाने चाहत्यांनाही धन्यवाद दिला आणि म्हटले की आज मी जो काही आहे , ते चाहत्यांमुळेच आहे. याव्यतिरिक्त त्याने भारतीय क्रिकेट आणि उत्तर प्रदेश क्रिकेटचे अभिनंदन केले आणि म्हटले की, यूपीवरून येणाऱ्या एका मुलाचे भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धन्यवाद!

https://twitter.com/ImRaina/status/1294959385215549441

रैनाने आपल्या संपूर्ण कारकिर्दीची झलक असणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

https://twitter.com/ImRaina/status/1294970758179901442

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---