वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा शेवट झाल्यानंतर सोमवारी (दि. 20 नोव्हेंबर) बीसीसीआयने आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. या मालिकेसाठी भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. विशेष म्हणजे, टी20 क्रिकेटचा विस्फोटक खेळाडू सूर्यकुमार यादव याच्याकडे या मालिकेसाठी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, श्रेयस अय्यर अखेरच्या 2 सामन्यासाठी संघात उपकर्णधार म्हणून जोडला जाणार आहे. अशात काही खेळाडूंना या मालिकेसाठी निवडले नाही. त्यापैकीच एक म्हणजे युझवेंद्र चहल होय. त्याने आपल्या ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा आपल्या निर्णयाने सर्वांना धक्का देत भारतीय संघातून फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याचा पत्ता कट केला. टी20 मालिकेसाठी संघातून ड्रॉप करताच युझवेंद्र चहलची पहिली रिऍक्शन (Yuzvendra Chahal Reaction) समोर आली आहे. त्याने ट्विटरवर इमोजी शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाला चहल?
खरं तर, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघ (Team India) पुढील आव्हानासाठी तयार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia T20 Series) संघात एक-दोन नाही, तर तब्बल 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी चहलला दुर्लक्षित केले गेले आहे. या संघात निवड न झाल्याबद्दल आपल्या अंदाजात सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
😊
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) November 20, 2023
त्याने ट्विटरवर एक हसणारा इमोजी शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टमध्दये त्याच्या हसण्यातही त्याच्या वेदना स्पष्ट दिसत आहेत. सलग ड्रॉप केल्यामुळे चाहतेही संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तसेच, त्यांना जोरदार ट्रोलही करत आहेत. खरं तर, विश्वचषक 2023 स्पर्धेत निवड न झाल्यानंतर चहल सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत खेळत होता. तिथे त्याने 7 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 माालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार (cricketer yuzvendra chahal reaction after being dropped from team india for t20 series against australia)
हेही वाचा-
World Cup Final नंतर वानखेडे स्टेडियम चर्चेत! नरेंद्र मोदी स्टेडियमला झुकते माप देत असल्याचे…
BREAKING: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कर्णधार, असा आहे संघ