इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (३१ मार्च) अनोखा निर्णय घेतला आहे. ईसीबीने खेळाडूंवर सामना चालू असताना स्मार्टवॉच घालण्यावर बंदी घातली आहे. ईसीबीने भ्रष्टाचारविरोधी नियम कठोर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार ईसीबीने सांगितले की, “काऊंटी क्रिकेटच्या (County Cricket) अनेक सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाते. त्यामुळे या नियमांना कठोर करण्यात येत आहे. याचा अर्थ असा की, स्मार्टवॉचवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. खेळाडू, सामना अधिकारी स्मार्टवॉच घालू शकणार नाहीत. फक्त जे सामने टी.व्ही. वर लाईव्ह पाहता येणार नाहीत, त्याच सामन्यांमध्ये स्मार्टवॉच वापरण्यास मान्यता दिली जाईल.”
काऊंटी क्रिकेटमध्ये अनेक सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) होणार असल्यामुळे ईसीबी बोर्डाने (England And Wales Cricket Board) हा निर्णय घेतला आहे. ईसीबीला असे अपेक्षित आहे की, या निर्णयामुळे खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत.
यावेळी ईसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही भ्रष्टाचारविरोधी कोड आणि पीएमओएच्या किमान मानकांचा वार्षिक आधारावर आढावा घेतो. जेणेकरून ते सध्याचे धोके आणि क्रिकेटला होणार्या जोखमीशी संबंधित असतील.“
महा स्पोर्ट्स टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@MahaSports) जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी मिळवा.
ट्रेंडिंग घडामोडी-
-घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स






