---Advertisement---

अवघ्या २० लाखात संधी मिळाले खेळाडू, ज्यांनी यंदाच्या आयपीएल हंगामात केली बहारदार कामगिरी

On: गुरूवार, मे 6, 2021 2:02 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेने युवा खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. या स्पर्धेत जगभरातील स्टार क्रिकेटपटू सहभाग घेत असतात, त्यामुळे युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन ही मिळत असते. तसेच आयपीएल स्पर्धेबद्दल असेही म्हटले जाते की, ज्या खेळाडूला आयपीएल खेळण्याची संधी मिळते तो, रातोरात श्रीमंत होऊन जातो.या स्पर्धेत असे अनेक खेळाडू होऊन गेले ज्यांच्यावर कोटींची बोली लावण्यात आली आहे.आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात ख्रिस मॉरिस आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. तर असेही काही खेळाडू होते,ज्यांना अवघ्या २० लाखांची बोली लावत संघात स्थान देण्यात आले होते आणि त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

१) हर्षल पटेल : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हर्षल पटेलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने अवघ्या २० लाखांच्या किमतीत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याने मोहम्मद सिराज सोबत मिळून मोलाची भूमिका बजावली होती. तसेच त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात ५ गडी बाद केले होते. इतकेच नव्हे तर आयपीएल २०२१ स्पर्धेत खेळलेल्या ७ सामन्यात त्याने १७ गडी बाद केले आहेत.त्याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण ५२ सामने खेळले आहेत. यात त्याला ५८ गडी बाद करण्यात यश आले आहे.

२) अर्शदिप सिंग : पंजाब किंग्ज संघाचा युवा गोलंदाज, अर्शदिप सिंग याने या हंगामात खेळलेल्या ६ सामन्यात ७ गडी बाद केले आहेत. त्याने २०१९ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. तेव्हापासून तो पंजाब संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत एकूण १६ सामने खेळले आहेत. यात त्याला १८ गडी बाद करण्यात यश आले आहे.मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीने, फलंदाजांना अडकवून ठेवले होते.

३) देवदत्त पडीक्कल : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कल याने २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १८ सामने खेळले आहेत. यात त्याला ६१० धावा करण्यात यश आले आहे. तर त्याने ६ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यात ५ अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे.

४) मार्को जांसेन : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक ५ वेळेस जेतेपद पटकावणारा संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मार्को जांसेनला २० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याला कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळायची संधी मिळाली होती. यात त्याला २ गडी बाद करण्यात यश आले होते. इतकेच नव्हे तर त्याने डेथ ओव्हर्स मध्ये देखील उल्लेखनीय गोलंदाजी केली होती.

५) शाहबाज अहमद : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ च्या लिलावात, शाहबाज अहमदला अवघ्या २० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान देण्यात आले होते. तसेच त्याला या हंगामात ५ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यात त्याने ४ गडी बाद केले होते. त्याने मधल्या षटकात येऊन किफायतशीर गोलंदाजी केली होती. तसेच त्याने आतापर्यंत एकूण २७ टी -२० सामने खेळले आहेत. यात त्याला २४ गडी बाद करण्यात यश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल भारतात आयोजित करण्याचा बीसीसीआयचा निर्णय चुकला का? गांगुलीने दिले उत्तर

यंदा सीएसके चांगली कामगिरी करेल, अशी मला अपेक्षाच नव्हती न्यूझीलंडच्या माजी अष्टपैलूचे धक्कादायक वक्तव्य

अंबानींच्या संघाची तऱ्हाच निराळी! परदेशी खेळाडूंना घरी पोहचवण्यासाठी केली खाजगी विमानाची व्यवस्था

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---