इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात, आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्स संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान सहाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.त्यामुळे बीसीसीआयने आणि आयपीएल कमिटीने तत्काळ बैठक घेत आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कोरोनाने थैमान घातले असताना, परदेशी खेळाडूंना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याचे आव्हान बीसीसीआय समोर होते. अशातच मुंबई इंडियन्स संघाचे संघमालक मुकेश अंबानी यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारने, भारतातून येणाऱ्या विमानावर १५ मे पर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या घरी परतण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. पण इतर खेळाडूंना सुखरूप आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी आपले खाजगी विमान देण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर संघातील खेळाडूंनाही आमंत्रण
फक्त मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू नव्हे तर मुकेश अंबानी यांनी इतर संघातील परदेशी खेळाडूंना देखील आपल्या खाजगी विमानातून घरी जाण्यासाठी आमंत्रण दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स संघात जे युकेला जाणारे खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी विमानाचा बंदोबस्त करता आला नाहीये. परंतु दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला जाण्यासाठी विमानाचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून ट्रेंट बोल्ट, ऍडम मिल्ने, जीमी नीशम आणि शेन बाँड हे खाजगी विमानातून प्रवास करणार आहेत. तसेच न्यूझीलंड संघातील इतर खेळाडू देखील त्यांच्यासोबत प्रवास करू शकतात.
इंग्लंड संघाचे खेळाडू मायदेशी रवाना
वेस्ट इंडिजला जाणारे विमान दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग मधून जाणार आहे. त्यामुळे क्विंटन डी कॉक आणि मार्को जेंसन या विमानातून प्रवास करू शकतात. त्यानंतर हेच विमान त्रिनिदाद मधून जाणार आहे. जिथे कायरन पोलार्ड राहतो. हे विमान आज किंवा उद्या जाणार आहे. तसेच इंग्लंड संघातील जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, जोस बटलर इंग्लंडला परतले आहेत. या खेळाडूंना इंग्लंडमध्ये जाऊन १० दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हे ३ युवा खेळाडू यंदाच्या आयपीएलमुळे रातोरात आले प्रसिद्धीझोतात
सिराजच्या भेदक यॉर्कर्सने माजी क्रिकेटपटू झाला प्रभावित, प्रशंसा करत म्हणाला
पंतप्रधानांनी स्वतः यावे आणि भारतात रस्त्यावर पडलेले मृतदेह पहावे, मायकेल स्लेटर पुन्हा बरसला





