fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कोरोना बाधितांच्या मदतीसाठी कुणाला माहित होऊ न देता दान करणारे ४ क्रिकेटपटू

सध्या जगातील अन्य देशांप्रमाणेच भारतासमोरही कोरोना व्हायरसचे संकट उभे आहे. त्यामुळे विविध स्तरातून केंद्र सरकार, राज्य सरकारला या संकटाविरुद्ध लढण्यासाठी मदत करण्यात येत आहे. त्याचबरोबर गरजूंच्या मदतीसाठीही अनेकजण पुढे आले आहेत. यामध्ये देशातील क्रिकेटपटूही मागे नाहीत. यातील काही क्रिकेटपटू असे आहेत ज्यांनी कोणतीही माहित न होऊ देता मदत केली आहे.

असे क्रिकेटपटू ज्यांनी कोरोना व्हायरसच्या विरुद्ध लढण्यासाठी कुणाला माहित होऊ न देता केली मदत – 

१. अजिंक्य रहाणे – भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने अन्य क्रिकेटपटूंप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाख रुपये दिले आहेत. याबद्दल त्याने स्वत: कोणतेही ट्विट किंवा पोस्ट केलेली नाही.

२. सौरभ तिवारी – भारतीय संघाचा डावकरी फलंदाज सौरभ तिवारीने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी १ लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीला दिले आहे. तसेच ५० हजार रुपये झारखंडच्या मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिले आहे.

३. ईशान किशन – २०१६ मध्ये १९ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार राहिलेला यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने दिड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत.

४. अनिल कुंबळे – भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज अनिल कुंबळेनेही पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये आणि कर्नाटक राज्य सहाय्यक निधीमध्ये दान केले आहे. पण त्याने किती रुपये दान केले आहे याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

ट्रेंडिंग घडामोडी – 

कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज

रोहित शर्माच्या १ वर्षाच्या मुलीने केली बुमराहची हुबेहुब नक्कल, बुमराही पडला चाट

वनडेत मॅचच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे ५ खेळाडू

You might also like