विश्वचषक ही स्पर्धा सर्वात महत्त्वाची मानली जाते. आपल्या देशाकडून विश्वचषक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. पण अनेक असे क्रिकेपटू आहेत ज्यांनी त्यांची मोठी कारकिर्द तर घडवली. मात्र त्यांना एकदाही विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली.
असे 5 खेळाडू ज्यांना कधीही विश्वचषकात खेळता आले नाही –
1. जस्टिन लँगर –
जस्टिन लँगर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंमधील एक नाव. त्यांनी सलामीवीर म्हणून मोठी कारकिर्द घडवली. त्यांनी 105 कसोटी सामने खेळताना त्यांनी 45.27 च्या सरासरीने 7696 धावा केल्या. त्यांनी आणि मॅथ्यू हेडनसह अनेक मोठ्या भागीदाऱ्या केल्या.
मात्र वनडेमध्ये त्यांना केवळ 8 सामने खेळण्याचीच संधी मिळाली. यात त्यांना एकही अर्धशतक करता आले नाही. त्यांनी केवळ 160 धावा वनडेत केल्या. पण 2000 च्या दशकातील बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघातील या प्रमुख सदस्याला मात्र कधीही विश्वचषक खेळता आला नाही.
त्यांनी 1997 ला शेवटचा वनडे सामना खेळला. या सामन्यानंतर त्यांनी 10 वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या 10 वर्षात ते ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नियमित सदस्य होते.
2. ऍलिस्टर कूक –
इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील एक दिग्गज नाव म्हणजे ऍलिस्टर कूक. 2018 ला निवृत्ती घेणाऱ्या कूकने 161 कसोटी सामने खेळताना 12 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत एक चांगली कारकिर्द घडवली. तसेच त्याने इंग्लंड संघाचे अनेक सामन्यांमध्ये नेतृत्वही केले.
कसोटीबरोबरच कूक 92 वनडे सामनेही खेळला. पण अश्चर्याची गोष्ट म्हणजे तो एकदाही विश्वचषकात खेळला नाही. त्याने 2014 ला शेवटचा वनडे सामना खेळला. वनडेत त्याने 5 शतकांसह 3204 धावा केल्या. मात्र वनडे क्रिकेटसाठी ज्याप्रमाणे जलद खेळ करावा लागतो तशी कूकची शैली नसल्याने त्याला वनडेत जास्त संधी मिळाली नाही.
3 व्हीव्हीएस लक्ष्मण –
भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणला नावलौकीक मिळाला आहे. 2000, 2010 च्या दशकातील भारताच्या सर्वोत्तम 4 फलंदाजांमध्ये त्याची गणना व्हायची. त्याने कसोटीत 134 सामने खेळले. या त्याने 17 शतकांसह 8781 धावाही केल्या.
मात्र वनडेत त्याला तितकी संधी मिळाली नाही. तो 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ 86 वनडे सामने खेळू शकला. मात्र त्याला एकदाही विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्याने 86 वनडेत 6 शतके आणि 10 अर्धशतकांसह 2338 धावा केल्या आहेत.
4 – इरापल्ली प्रसन्ना –
भारताच्या दिग्गज ऑफस्पिनरपैकी एक नाव म्हणजे इरापल्ली प्रसन्ना. 1962 ते 1978 या काळात प्रसन्ना यांनी 49 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 189 विकेट्स घेतल्या. तसेच 735 धावाही केल्या. मात्र त्यांना कधी वनडे क्रिकेटमध्ये खेळवण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना कधीही विश्वचषकातही सामील होण्याची संधी मिळाली नाही.
5. ख्रिस मार्टिन –
न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ख्रिस मार्टिन 5 व्या क्रमांकावर आहे. त्याने 13 वर्षे न्यूझीलंडकडून खेळताना 71 कसोटीत 233 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र वनडे कारकिर्द त्याची तितकी बहरली नाही.
2000 ला पदार्पण केलेल्या मार्टिनने केवळ 20 वनडे सामने खेळले. त्यात त्याला 18 विकेट्स घेता आल्या. त्याची 2007 च्या विश्वचषकासाठी दुखापतग्रस्त डॅरिल टफी ऐवजी निवड झाली होती. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
6. मॅथ्यू होगार्ड –
इंग्लंडचा दिग्गज कसोटीपटूंमध्ये मॅथ्यू होगार्डची गणना होते. वेगवान गोलंदाज असलेल्या होगार्डने त्याच्या कारकिर्दीत खेळलेल्या 67 कसोटी सामन्यात 248 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 2005 च्या ऍशेस मालिकेत महत्त्वाची भूमिकाही निभावली.
मात्र तो वनडेत एवढा यशस्वी ठरला नाही. त्याने केवळ 26 वनडे सामने खेळले. यात त्याने 32 विकेट्स घेतल्या. त्याला 2003 च्या विश्वचषकात इंग्लंड संघात संधी मिळाली होती. मात्र त्याला एकही सामना खेळता आले नाही.
ट्रेडिंग घडामोडी –
१०० कसोटी खेळलेले परंतु १०० वनडेही खेळायला न मिळालेले ५ खेळाडू
…आणि १३ वर्षांपुर्वी मलिंगाने आपण कोण आहोत हे जगाला दाखवुन दिले
५ असे खेळाडू ज्यांच्या नावावर आहेत ५ विचित्र विक्रम