पोर्तुगालचा स्टार फुटबाॅलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने तब्बल १२ वर्षांनी मँचेस्टर युनायटेड संघात पुनरागमन केले असून संघासाठी पहिल्याच सामन्यात २ गोलची दमदार कामगिरी केली आहे. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (११ सप्टेंबरला) खेळल्या गेलेल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने न्युकास्टलला ४-१ अशा फरकाने पराभूत केले आहे. या सामना विजयात क्रिस्टियानोची भूमिका महत्वाची राहिली.
क्रिस्टियानोने २००९ मध्ये मँचेस्टर युनायटेड संघा सोडला होता आणि स्पॅनिश क्लब रियाल मेड्रिडमध्ये सामील झाला होता. नजीकच्या काळातच त्याने युरोपियन ट्रांसफर विंडोच्या माध्यमातून त्याच्या जुन्या फुटबाॅल क्लब, मँचेस्टर युनायटेडमध्ये पुनरागमन केले आहे. याआधी तो इटलीचा क्लब युबेटससाठी खेळत होता.
मँचेस्टरसाठी पुनरागमनानंतर पहिला सामना खेळत असताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. सामन्यात त्याने दोन गोल केले आहेत. सामन्याचा पहिला हाफ ०-० अशा बरोबरीने संपेल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना रोनाल्डोने ४५+२ व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल केला. या गोलच्या मदतीने मँचेस्टरने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. सामना पाहण्यासाठी रोनाल्डोची आई मैदानात उपस्थित होती. त्याने मँचेस्टरसाठी पहिला गोल करताच तिला भावना अनावर झाल्या आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले दिसले.
Ronaldo’s Mum behind me after him scoring, my heart cannot cope ❤️🇾🇪 pic.twitter.com/klzl3Ysafm
— Ambo💫 (@Ambo_91) September 11, 2021
Cristiano Ronaldo's mom after he scored 🧡🧡🧡🧡🧡…
Gotta love mothers pic.twitter.com/06Er3Gg6Xd
— ChrisHazeArt.tez #MUFC 🔴🔥 (@PrinceChrisMUFC) September 11, 2021
मँचेस्टरसाठी रोनाल्डोने पहिल्या सामन्यात केले दोन गोल
सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये न्युकास्टल संघाच्या जेवियर मॅक्यूलो याने ५६ व्या मिनिटाला सामन्यातील दुसरा गोल केला आणि सामना १-१ अशा बरोबरीवर आला. त्यानंतर रोनाल्डोने ६२ व्या मिनिटाला सामन्यातील त्याचा दुसरा गोल केला आणि पुन्हा मँचेस्टरला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मँचेस्टरसाठी ८० व्या मिनिटाला ब्रूनो फर्नांडिस आणि ९०+२ व्या मिनिटाला जेसी लिंगार्ड यांनी अनुक्रमे दोन गोल केले आणि सामना ४-१ अशा फरकाने जिंकला.
मँचेस्टरने या सामन्यानंतर पहिल्यांदाच इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये स्वत:च्या घरच्या मैदानात सलग पाचवा सामना जिंकला आहे. मँचेस्टरला त्यांच्या घरच्या मैदानात न्यूकास्टल संघाविरुद्ध २७ सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात पराभव मिळाला आहे. यातील १८ सामने मँचेस्टरने जिंकेले आसून ८ सामने ड्राॅ झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोहलीला भेटण्यासाठी रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये झाला सहभागी’, शुबमन गिलचे ट्वीट तुफान व्हायरल
थेट डोक्याने २ गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा बनला G.O.A.T., केला ‘हा’ विश्वविक्रम
ओ शेठ! मेस्सी रोनाल्डोच्या फॅनची अफलातून रिल्स, लाखो व्हूव्जचा पडतोय पाऊस