---Advertisement---

मोठी बातमी! ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कोसळला दु:खाचा डोंगर, मुलाचे झाले निधन; वाचा सविस्तर

On: मंगळवार, एप्रिल 19, 2022 8:12 AM
Cristiano-Ronaldo-Family
---Advertisement---

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवरही चर्चा घडून येतात. पण नुकतेच त्याच्या आयुष्यात एक दु:खद घटना घडली आहे. त्याच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. याबाबत स्वत: रोनाल्डोने माहिती दिली आहे. 

रोनाल्डोच्या नवजात बाळाचे निधन 
रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्ज यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की, ते जुळ्या मुलांचे आई-वडील होणार आहेत. पण, सोमवारी (१८ एप्रिल) रोनाल्डोने सोशल मीडियावर त्याच्या नवजात मुलाचे निधन झाल्याची माहीती दिली, त्याचबरोबर त्याने हे देखील सांगितले की, त्याची नवजात मुलगी सुरक्षित आहे.

सोमवारी रोनाल्डो आणि जॉर्जिना यांच्याद्वारे संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आले. त्यात लिहिले होते की, ‘खूप दु:खी अंतकरणाने आम्हाला हे सांगावे लागत आहे की, आमच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. हे कोणत्याही आई-वडिलांसाठी सहन करावे लागणारे सर्वात मोठे दु:ख आहे. पण, आमच्या मुलीचा जन्मच आम्हाला ताकद देत आहे आणि हे दु:ख झेलण्याची शक्ती देत आहे. आम्ही सर्व डॉक्टर आणि नर्स यांचे आभार मानतो, ज्यांनी आमची साथ दिली.’

तसेच निवेदनात पुढे लिहिले आहे की, ‘या घटनेमुळे आम्ही पूर्ण हताश आहोत आणि सर्वांना विनंती करतो की आमच्या खाजगी आयुष्याचा सन्मान कराल. आमचा मुलगा आमच्यासाठी देवदूत होता, आम्ही त्याच्यावर नेहमी प्रेम करू.'(Cristiano Ronaldo announces death of newborn son)

रोनाल्डोने प्रेग्नंट जॉर्जिना दिलेले मोठे सरप्राईज
रोनाल्डो हा त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्याने ती प्रेग्नंट असताना जानेवारी २०२२ मध्ये तिचा २८ वा वाढदिवस जोरदार साजरा केला होता. त्याने तिच्यासाठी दुबई येथे असलेली जगातील सर्वात मोठी बिल्डिंग बुर्ज खलिफावर वैयक्तिक लेझर शो जॉर्जिनासाठी सरप्राईज म्हणून भेट दिले होते. रोनाल्डोला याआधी २ मुले आणि २ मुली आहेत. त्याचा मोठा मुलगा १२ वर्षांचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अशा ६ घटना जेव्हा नाईटवॉचमन म्हणून खेळायला आलेल्या क्रिकेटपटूने केले शतक

स्पोर्ट्स रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंट लीगचा पहिलावहिला हंगाम १५ एप्रिलपासून

असा कर्णधार होणे नाही!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---