---Advertisement---

ओ शेठ.. तुम्ही नादच केलाय थेट! रोनाल्डोने गाठला ४०० मिलियन इंस्टाग्राम फॉलोवर्सचा जादुई आकडा

On: सोमवार, फेब्रुवारी 7, 2022 8:30 PM
Ronaldo's-400m-Followers
---Advertisement---

प्रतिष्ठित फुलबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याला त्याच्या मैदानावरील चपळ आणि वेगवान गोल करण्याच्या अंदाजासाठी ओळखले जाते. फुलबॉल या खेळातील तो सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या नावावर बऱ्याचशा विलक्षण विक्रमांचीही नोंद आहे. याच रोनाल्डोने सोमवारी (०६ फेब्रुवारी) मोठा किर्तीमान केला आहे. त्याने इंस्टाग्राम या सोशल मीडिया ऍपवर ४०० मिलियन फॉलोवर्स (Cristiano Ronaldo 400 Million Instagram Follower) पूर्ण केले आहेत. असा पराक्रम करणारा तो पहिलाच व्यक्ती बनला आहे. विशेष म्हणजे त्याने त्याच्या ३७ व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हा जादुई आकडा गाठला आहे. 

https://www.instagram.com/p/CZTxiEfA2fM/?utm_source=ig_web_copy_link

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत रोनाल्डोनंतर अमेरिकेची मॉडेल आणि प्रसिद्ध बिजनेस वुमन कायली जेनर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३०८ मिलियन फॉलोवर्स आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर फुलबॉलपटू लियोनल मेस्सी असून त्याचे ३०८ मिलियन फॉलोवर्स आहेत.

https://www.instagram.com/p/CZnOsSxgqoO/?utm_source=ig_web_copy_link

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याचेही इंस्टाग्रामवर १८२ मिलियन फॉलोवर्स आहेत. तो भारतातील सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोवर्स असणारा व्यक्ती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गेल्या १६ वनडेत दहाव्यांदा विंडीजचा संघ सर्वबाद; अष्टपैलू होल्डर म्हणाला, ‘आम्हाला विकेट्सचे महत्त्व…’

आपलेच दात आपलेच ओठ! सूर्यकुमारमुळे रिषभ पंत दुर्देवीरित्या धावबाद, जड मनाने परतला तंबूत

पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर दीपक हुडा झाला इमोशनल; म्हणाला, ‘विराट भैय्याकडून कॅप मिळणे…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---