युरोने हंगामातील सर्वोत्कृष्ट गोलचे नामांकन केलेल्या ११ फुटबॉलपटूमध्ये क्रिस्तियानो रोनाल्डोच्या बायसिकल कीकचा समावेश आहे. हा गोल त्याने जुवेंट्स विरुद्ध केला होता.
तर रियल माद्रीदच्या गॅरेथ बॅलेनेही रोनाल्डो सारखाच गोल केला होता. पण त्या गोलला युरोचे नामांकन मिळाले नाही. बॅलेने हा गोल चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात लीव्हरपूल विरुद्ध केला आहे. हा सामना रियलने ३-१ असा जिंकत चॅम्पियन्स लीगचे तिसरे चषक जिंकले.
The #UCL representative in the UEFA Goal of the Season vote… @Cristiano Ronaldo 🔥🔥🔥
Have you voted yet? ⬇️⬇️⬇️
— UEFA Champions League (@ChampionsLeague) August 14, 2018
३३ वर्षीय रोनाल्डोने यावेळी नेटच्या दिशेला पाठ करून उभा असताना त्याने अशा प्रकारे हा गोल केला की कोणाला कळलेच नाही की नक्की झाले काय. हा सामना रियलने ०-३ असा जिंकला होता.
तसेच फ्रेंच फुटबॉलपटू दिमित्री पॅयेटने युरोप लीगमध्ये मॅरसिलेकडून खेळताना आर बी लेपझीग विरुद्ध केलेल्या गोलला तर डेन्मार्कचा क्रिस्टन एरिकसेन, इंग्लंड फुटबॉलपटू ल्युसी ब्रॉझे आणि इलियट एम्बलटन यांचाही यामध्ये समावेश आहे.
युरोने नामांकन दिलेले फुटबॉलपटू
ल्युसी ब्रॉझे (लायन १-० मॅंचेस्टर सिटी)
ओल्गा कॅरमोना (स्वित्झर्लंड ०-२ स्पेन)
एलसॅन्ड्रो (स्पोर्टींग सी पी २-५ इंटर)
इलियट एम्बलटन (तुर्की २-३ इंग्लंड)
क्रिस्टन एरिकसेन ( आयर्लंड १-५ डेन्मार्क)
पॉलो स्ट्रेला (पोर्टो ५-१ बेसिकेटीएस)
इवा नॅवरो (जर्मनी ०-२ स्पेन)
दिमित्री पॅयेट (मॅरसिले ५-२ लेपझीग)
गोनकॅलो रॅमोस (स्लोवेनिया ०-४ पोर्तुगल)
रिकार्डीन्हो (पोर्तुगल ४-१ रोमानिया)
क्रिस्तियानो रोनाल्डो (जुवेंट्स ०-३ रियल माद्रीद)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–स्टेडियम रिकामे तरी प्रीमियर लीगचे क्लब फायद्यात
–आतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त?