---Advertisement---

रणजी ट्रॉफीवर टीका करण चुकीचं! निवृत्तीनंतर मनोज तिवारीवर बीसीसीआयची कडक कारवाई

Manoj Tiwari
---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये बंगाल संघाकडून त्याने आपला शेवटचा सामना बिहार संघाविरुद्ध खेळला आणि जिंकला. मगच्या काही दिवसांपासून मनोज तिवारीची काही विधाने आणि सोशल मीडिया पोस्ट चर्चेत राहिल्या. पण एक पोस्ट माजी क्रिकेटपटूला महागात पडली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने यामुळे मनोज तिवारीवर कारवाई देखील केली.

मनोज तिवारी (Manoj Tiwari) याने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट शेअर केली. देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची रणजी ट्रॉफी बंद झाली पाहिजे, असे मनोजने या पोस्टमध्ये लिहिले होते. पोस्टमध्ये त्याने हिले होते की, “पुढील हंगामापासून रणजी ट्रॉफी कॅलेंडरमधून वगळण्यात यावी. या स्पर्धेत अनेक गोष्टी चुकीच्या होत आहेत. समृद्ध इतिहास असेलली ही प्रतिष्ठित स्पर्धा अनेक गोष्टींवर विचार करावा लागणार आहे. स्पर्धा आपले आकर्षण आणि महत्व गमावत चालली आहे, याचे वाईट वाटते.”

मनोज तिवारीच्या या पोस्टवर चांगलीच चर्चा झाली. पण बंगाल क्रिकेट संघाच्या कर्णधारावर याच पोस्टमुळे कारवाई देखील झाली. रणजी ट्रॉफीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या मनोज तिवारवर बीसीसीआयने दंड स्वरूपात एका रणजी सामन्याच्या 20% सामनाशुल्क वसूल केले आहे.

दरम्यान, बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय संघातून सध्या बाहेर असेलल्या सर्व खेळाडूंना सुचना केल्या आहेत. बीसीसीआयने सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी सर्वांना आपली गुणवत्ता रणजी ट्रॉफीमध्ये सिद्ध करावी लागेल. मनोज तिवारीने रणजी ट्रॉफीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतरच बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे अनेक युवा खेळाडू रणजी हंगामातील शेवटच्या सामन्यांसाठी उपलब्ध देखील झाले होते. पण काहींनी अद्याप रणजी हंगामातील एकही सामना खेळला नाहीये. ईशान किशन रणजी हंगामात न खेळल्यामुळे माध्यमांमध्ये प्रचंड चर्चा झाली. अशात रणजी सामने न खेळणाऱ्या खेळाडूंना आगमी काळात भारताकडून खेळण्याची संधी मिळणार की नाही, हे पाहण्यासारखे असेल.

मनोज तिवारीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने 12 वनडे आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या मनोजला जुलै 2015 नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता आला नाही. अशातच त्याने रविवारी (18 फेब्रुवारी) रणजी क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेतली. (Criticizing Ranji Trophy is wrong! BCCI takes strict action against Manoj Tiwari after his retirement)

महत्वाच्या बातम्या – 
प्रकाश पुराणिक ट्रॉफीसाठी आजपासून महिलांचे टी-२० द्वंद्व, विजेत्यांवर होणार लाखो रुपयांच्या रोख बक्षीसांचा वर्षाव
‘आता गमावण्यासाठी काहीच राहिलं नाही…’, टीम इंडियातील संधीबाबत मनोज तिवारीचा धोनीला थेट प्रश्न

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---