देशासाठी क्रिकेट खेळावे, हे स्वप्न लहानपणी प्रत्येक भारतीय चाहता पाहता पाहत असतो. पण प्रत्यक्षात भारतासाठी खेळण्याची संधी केवळ 11 खेळाडूंनाच मिळत असते. दशकभरात देशाकडून नाव करणारे क्रिकेटपटू हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच तयार होता. पण राष्ट्रीय संघाकडून संधी मिळाली नाही, अशी तक्रार करणाऱ्या क्रिकेटपटूंची संख्या मोठी असते. मनोज तिवारी याच्यासोबतही असेच काहीसे झाले आहे.
मनोज तिवारी (Manoj Tiwary) याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळले. पण त्याला अपेक्षित संधी मिळाल्या नाही, असे माजी क्रिकेटपटू आणि अनेक जाणकारांचे मत आहे. मनोजने नुकताच बंगाल क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करताना आपला शेवटचा रणजी सामना खेळला आणि रेड बॉल क्रिकेटमधून तो निवृत्त झाला. क्रिकेटमधून निवृती घेतल्यानंतर मनोज तिवारीची मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे. त्याने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याला आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द मोठी न होण्यासाठी एकप्रकारे जबाबदार ठरवले आहे.
मनोज तिवारीने 2008 साली भारतीय क्रिकेट संघाकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने पुढच्या 7 वर्षात आठ वेगवेगळ्या मालिकांमध्ये भारतासाठी 12 वनडे आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. डिसेंबर 2011 मध्ये त्याने चेन्नईमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध नाबाद 104* धावांची खेळी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे पहिले शतक होते. पण या अप्रतिम खेळीनंतर त्याला पुढच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. देशासाठी पुढचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मनोज तिवारीला 7 मिने वाट पाहावी लागली.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनोज तिवारी म्हणाला, “संधी मिळाली तर मी त्याला (धोनी) नक्की विचारेल की, मी शतक केल्यानंतर देखील मला संघातून बाहेर का केले गेले. खासकरून त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून ज्यामध्ये कोणीच धावा करत नव्हतं. विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना देखील त्यावेळी धावा करण्यात अपयशी होत होते. आता माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच राहिले नाही.”
Few moments bring tears to your eyes, few moments make you emotional… 🙌#GoodByeCricket pic.twitter.com/d4Pd8nSXbZ
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) February 19, 2024
मनोज तिवारच्या मते 2012 साली त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचारात घेतले पाहिजे होते. पण संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. दरम्यान, मनोजने सोमवारी (19 फेब्रुवारी) आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक भावूक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओत आपला शेवटचा रणजी सामना खेळल्यानंतर त्याला सर्वजन शुभेच्छा देत आहेत. (Manoj Tiwary’s Shocking Statement About MS Dhoni After Retiring From Ranji Cricket)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । जडेजाच्या यशामध्ये पत्नीचा हात! पाहा सामनावीर ठरल्यानंतर का केला रिवाबाचा उल्लेख
IPL 2024 आधी चमकलं दुष्मंथा चमीराचं नशीब! केकेआरच्या इंग्लिश गोलंदाजाला केले रिप्लेस