पुढिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. 15 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध तीन टी20 आणि 3 कसोटी सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी मंगळवारी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली आहे.
टी20 मालिकेसाठी निवड केलेल्या 14 जणांच्या दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व क्विंटॉन डीकॉकला देण्यात आले आहे. या टी20 मालिकेसाठी फाफ डु प्लेसिसला संधी देण्यात आली नाही. पण कसोटी मालिकेसाठी मात्र डु प्लेसिसच कर्णधार असणार आहे.
त्याचबरोबर या दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनलाही संधी देण्यात आलेली नाही.
तसेच दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात तीन नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्जे, अष्टपैलू क्रिकेटपटू सेनूरन मुथुसामी आणि यष्टीरक्षक फलंदाज रुडी सेकंड यांचा समावेश आहे.
याबरोबरच टी20 संघातही तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तेंबा बावूमा, अष्टपैलू क्रिकेटपटू बीजॉर्न फॉरच्यून आणि नॉर्जे या नवीन खेळाडूंना टी20 संघात सामील करण्यात आले आहे.
टी20 संघाचे उपकर्णधारपद रस्सी वॅन डर दसनकडे सोपवण्यात आले आहे. तर कसोटीचे उपकर्णधारपद तेंबा बावूमाला देण्यात आले आहे.
भारत दौऱ्यासाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ –
टी20 संघ – क्विंटन डी कॉक (कर्णधार), रस्सी व्हॅन डर दसन (उपकर्णधार), तेंबा बावूमा, ज्युनियर डाला, बीजॉर्न फॉरच्यून, बोरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एन्रीच नॉर्जे, अॅन्डिले फेहलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस, ताब्राईज शम्सी, जॉन-जॉन स्मट्स.
कसोटी संघ – फाफ डू प्लेसिस (कर्णधार), तेंबा बावूमा (उपकर्णधार), थ्यूनिस डी ब्रूयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गार, झुबेर हमजा, केशव महाराज, एडेन मार्करम, सेनूरन मुथुसामी, लुंगी एन्गीडी, एन्रिच नॉर्जे, वर्नोन फिलँडर, डेन पिडेड, कागिसो रबाडा, रुडी सेकंड
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक – [फ्रिडम ट्रॉफी – 2019(भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका)] –
टी20 मालिका–
15 सप्टेंबर – पहिला टी20 सामना – धरमशाला
18 सप्टेंबर – दुसरा टी20 सामना – मोहाली
22 सप्टेंबर – तिसरा टी20 सामना – बंगळूरु
कसोटी मालिका-
2-6 ऑक्टोबर – पहिली कसोटी – विशाखापट्टणम
10-14 ऑक्टोबर – दुसरी कसोटी – पुणे
19-23 ऑक्टोबर – तिसरी कसोटी –रांची
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली
–बरोबर २९ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा
–राहुल द्रविडला हितसंबंधाच्या प्रकणात मिळाला मोठा दिलासा