इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल २०२२) (IPL 2022) साठीचा मेगा लिलाव (Mega Auction) १२ व १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे पार पडला. जगभरातील ६०० खेळाडूंची नावे या लिलावासाठी अंतिम करण्यात आली होती. त्यापैकी २०४ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. अनेक युवा खेळाडूंना कोट्यवधी रुपये या लिलावात मिळाले. त्याचवेळी, काही दिग्गज खेळाडू असे होते ज्यांना घेण्यासाठी एकाही संघाने रस दाखवला नाही. मिस्टर आयपीएल नावाने ओळखला जाणारा भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) हा देखील या लिलावात विकला गेला नाही. त्याची पूर्वीची फ्रॅंचाईजी चेन्नई सुपर किंग्सने त्यावर बोली न लावल्याने तो अनसोल्ड राहिला. त्यानंतर आता चेन्नई संघाने एक सोशल मीडिया पोस्ट करत त्याचे आभार मानले आहेत. (Suresh Raina Unsold)
चेन्नई संघाने केली पोस्ट
सुरेश रैना याला या मेगा लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. तो ज्या संघासाठी १० हंगाम खेळला त्या चेन्नई संघानेही त्यावर बोली लावली नाही. यामुळे चेन्नई संघाला टीकेला देखील सामोरे जावे लागत आहे. त्याच वेळी आता चेन्नई संघाने एक सोशल मीडिया पोस्ट केली. त्यांनी लिहिले आहे की, ‘सुपर थँक्स फॉर यलो मेमरी चिन्ना थाला! सुपरकिंग फॉरेवर’
Super Thanks for all the Yellove memories, Chinna Thala!🥺
#SuperkingForever 🦁 pic.twitter.com/RgyjXHyl9l
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 13, 2022
अशी राहिली आहे कारकीर्द
सुरेश रैना याला आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज मानले जाते. त्याने आत्तापर्यंत १० हंगाम चेन्नई संघासाठी खेळले आहेत. दोन हंगाम तो गुजरात लायन्स संघाचा कर्णधार होता. तर, २०२० आयपीएल मधून त्याने माघार घेतली होती.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैना चौथ्या क्रमांकावर आहे. २०५ सामने खेळून त्याने ५५२८ धावा केल्या आहेत. तसेच २५ बळीही घेतले आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद १०० होती. रैनाने आयपीएलमध्ये २०३ षटकार आणि ५०६ चौकार मारले आहेत.
महत्वाच्या बातम्या-