भारताता कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्यातच कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धा देखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. हा हंगाम सुरु असताना संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी हा देखील कोरोनाच्या विळख्यात अडकला होता.
पण आता आनंदाची बातमी अशी की हसीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, आणखी काही काळ तो क्वारंटाईमध्येच राहिल. तरी या काळात त्याची काळजी घेतल्याबद्दल त्याने चेन्नई संघाचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर असेही समजत आहे की जर हसीचा आणखी एक कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तर तो अन्य ऑस्ट्रेलियन सदस्यांप्रमाणे मालदीवला रवाना होऊ शकतो.
सध्या आयपीएल २०२१ हंगामाचा भाग असलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचकांचा संपूर्ण ताफा मालदीवमध्ये आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या सर्वांसाठी सीमाबंदी केली असल्याने त्यांना त्यांच्या मायदेशाच १५ मेपर्यंत जाता येणे शक्य नसल्याने त्यांना मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला होता. तेथून ते मायदेशी परततील.
हसीबद्दल चेन्नई संघाचे सीइओ कासी विश्वनाथन यांनी पीटीआयला माहिती दिली की ‘दिल्लीवरुन चेन्नईला एअर अँब्यूलन्समधून येण्यापूर्वीच हसीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. तो आता ठिक आहे. सर्व संघातील परदेशी सदस्य परतले आहे. मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग उद्या (८ मे) रवाना होईल.’
हसीबरोबरच चेन्नईचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याला देखील एअर अँब्यूलन्सद्वारे दिल्लीतून चेन्नईत आणले आहे.
हसीने मानले चेन्नईचे आभार
‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार हसी म्हणाला, ‘मी विश्रांती घेत आहे आणि मला चांगले वाटत आहे. माझ्यासाठी सीएसकेने जे केले आणि करत आहेत, त्यासाठी मी कृतज्ञ राहिल.’
तो पुढे म्हणाला, ‘भारतात जे काही होत आहे ते भयानक आहे आणि मी भाग्यशाली आहे की मला इतका पाठिंबा मिळाला. मला भारत आणि ऑस्ट्रेलियामधून क्रिकेट चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या संदेशाबद्दल आभारी आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीत कोरोनाचा तांडव, भीतीपोटी विलियम्सनसह ‘या’ किवी खेळाडूंनी वेळेपूर्वीच घेतला भारताचा निरोप
कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना! ‘या’ खेळाडूंना निवडणे टीम इंडियाला पडणार महागात, आहेत ‘आऊट ऑफ फॉर्म’