---Advertisement---

Video: ज्यांच्यामुळे IPL Final होऊ शकली, त्यांना कसा विसरेल धोनी; ट्रॉफी उंचावल्यानंतर केलं ‘हे’ काम

MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय क्रिकेटला लाभलेल्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे महेंद्र सिंग धोनी होय. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 2 वर्षे उलटली आहेत. मात्र, तो इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत अजूनही सक्रिय आहे. नुकतेच त्याने आयपीएल 2023 स्पर्धेचे विजेतेपद आपल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला पाचव्यांदा मिळवून दिले. नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे रंगलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ आमने-सामने होते. या विजयानंतर धोनीने रवींद्र जडेजा याला उचलून घेतले होते, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. याव्यतिरिक्त चेन्नईच्या खेळाडू आणि चाहत्यांचे जल्लोषाचे अनेक फोटो आणि व्हिडिओही समोर आले. मात्र, आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने सर्वांची मने जिंकली आहेत.

आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने मैदानातील कर्मचाऱ्यांना खास धन्यवाद दिला. धोनीने विजयानंतर मैदानातील कर्मचाऱ्यांना आपल्याजवळ बोलावले आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. यानंतर त्याने अनेक कर्मचाऱ्यांना ऑटोग्राफही दिला. धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कर्मचाऱ्यांची मोठी मेहनत
झालं असं की, आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. हा सामना 28 मे रोजी होणार होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना होऊ शकला नाही. त्यानंतर सामना राखीव दिवशी 29 मे रोजी खेळवण्यात आला. राखीव दिवशी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाच्या खेळीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. तसेच, जवळपास 2 तास खेळ थांबवला गेला. यावेळी मैदानाची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मोठ्या मेहनतीमुळे सामना पुन्हा सुरू होऊ शकला. मैदान कर्मचाऱ्यांच्या याच मेहनतीची धोनीनेही दखल घेत त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्यासोबत वेळही घालवला.

यादरम्यान धोनीने पोलीस अधिकाऱ्यांसोबतही फोटो काढला, जो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

चेन्नईची पाचवी वेळ
महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावली. यासह त्यांनी मुंबई इंडियन्स संघाच्या पाच ट्रॉफींशी बरोबरी केली. धोनीने या सामन्यानंतर निवृत्ती घेण्याच्या प्रश्नावर म्हटले की, तो पुढील हंगामातही खेळताना दिसू शकतो. आता चाहत्यांनाही पुढील हंगामात खेळताना पाहण्याची उत्सुकता लागली आहे. (csk captain ms dhoni heartwarming gesture with ground staff after win fifth ipl title)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पती शेर, तर पत्नी सव्वाशेर! पाहा भारतीय क्रिकेटर्स अन् क्रीडाक्षेत्रात नाव कमावणाऱ्या त्यांच्या सुंदर बायका

गोष्ट एका क्रिकेटरची भाग 17: धोनी आधी पदार्पण करुनही 14 वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---