---Advertisement---

मोठ्या दिलाचा धोनी! कठीण वेळी मोहितला जवळ करत दिले प्रोत्साहन, पंड्यानेही मारली कडकडून मिठी

Mohit-Sharma-And-MS-Dhoni-And-Hardik-Pandya
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेची ट्रॉफी आपल्या नावावर केली. मंगळवारी (दि. 30 मे) रात्री जवळपास 2 वाजता अंतिम सामन्याचा निकाल लागला. या सामन्यात सीएसकेने गुजरात टायटन्स संघाला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. एमएस धोनी याच्या चेन्नई संघाचा हुकमी एक्का असलेल्या रवींद्र जडेजा याने अखेरच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून संघसहकाऱ्यांना विजयाच्या जल्लोषात बुडण्याचा यादगार क्षण दिला. तसेच, गुजरातसाठी अखेरचे षटक टाकणाऱ्या मोहित शर्मा सर्वात मोठा हिरो बनता-बनता राहिला.

मोहित शर्मा (Mohit Sharma) याने आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातील अखेरच्या षटकात सर्वकाही पणाला लावले. मात्र, त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्यानंतर मोहित निराश झाल्याचे दिसला. मात्र, मोहितच्या डोक्यावर हात ठेवून एमएस धोनी (MS Dhoni) याने त्याला धीर दिला. तसेच, कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यानेही त्याला मिठी मारली.

धोनीने दिले प्रोत्साहन
खरं तर, सोशल मीडियावर अखेरच्या चेंडूचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात धोनी गुजरातच्या सर्व खेळाडूंशी हातमिळवणी करताना दिसत आहे. व्हिडिओत धोनी मोहितशी जेव्हा हस्तांदोलन करत असतो, तेव्हा तो त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहे. मोहित गुजरातसाठी अंतिम सामन्यात मोठा हिरो बनता-बनता राहिला.

हार्दिक पंड्याने मारली मिठी
अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रवींद्र जडेजा (Ravindra Jadej) याच्या बॅटमधून चौकार निघताच मोहितचा चेहरा उतरला होता. मोहित मान खाली करून पुढे जात होता. त्यावेळी हार्दिक पंड्या त्याच्या दिशेने गेला आणि आपल्या गोलंदाजाला मिठी मारली.

हार्दिक यावेळी मोहितशी काहीतरी बोलत त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करताा दिसला. या व्हिडिओत विजय शंकरही दिसत होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

मोहितची हंगामातील कामगिरी
मोहित शर्मा हंगामात चांगलाच चमकला. त्याने 14 सामने खेळताना 8.17च्या इकॉनॉमी रेटने 27 विकेट्स घेतल्या. तो हंगामात मोहम्मद शमी (Mohammad Shami) याच्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज बनला. 10 धावा खर्च करत 5 विकेट्स ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे. शमीच्या नावावर 17 सामन्यात 28 विकेट्स आहेत. (skipper ms dhoni console mohit sharma while hardik pandya hugged gujarat titans bowler after ravindra jadeja hits four on last ball ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023मध्ये अजिंक्य रहाणे कसा बनला विस्फोटक फलंदाज? चेन्नईच्या हेड कोचने सांगितलं गुपीत
जड्डूने विजयी चौकार मारताच चाहते ‘आऊट ऑफ कंट्रोल’, चेन्नईच्या मेट्रो स्टेशनमध्येच घातला राडा, Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---