सर रविंद्र जडेजा… कोणताही क्रिकेटपटू त्याच्या लक्षणीय कामगिरीने क्रिकेटरसिंकांचे मन जिंकतो आणि आपोआप त्याला एक विशेष उपाधी दिली जाते. माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरला मास्टर ब्लास्टर, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला कॅप्टनकूल, रोहित शर्माला हिटमॅन, विराट कोहलीला रनमशीन अशा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना त्यांच्या कामगिरीनुसार खास उपाधी देण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे, अष्टपैलू रविंद्र जडेजा याचे.
रविवारी (२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या तुल्यबळ संघात चुरशीची लढत झाली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या थरारक सामन्यात जडेजाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात आपल्या नावाचा डंका वाजवला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीने आजी-माजी क्रिकेटपटूंपासून ते क्रिकेटशौकिनांपर्यंत सर्वांना भुरळ पाडली.
त्याच्या या धमाकेदार कामगिरीनंतर सोशल मीडियावर ‘सर रविंद्र जडेजा’ नाव ट्रेंडमध्ये आहे. अशात याच नावाशी संबंधित एक ट्विट आयपीएलप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार एमएस धोनीने केलेले ते जुने ट्विट आहे.
साल २०१३ मध्ये अर्थातच ८ वर्षांपुर्वी धोनीने ट्विट करत लिहिले होते, ‘देवाला आधीच लक्षात आले होते की रजनी सर म्हातारे होत आहेत, म्हणून त्यांनी सर रविंद्र जडेजाला बनवले’
God realised RAJNI sir is getting old so he created sir ravindra jadeja
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) April 9, 2013
ट्विटर वापरकर्त्यांनी या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी धोनीच्या ट्विटला अगदी बरोबर असल्याचे सांगत संमती दर्शवली आहे.
— Janani Ravichandran (@jananiRchandran) April 25, 2021
https://twitter.com/ThalaivarVeriy8/status/1386299571677011968?s=20
1000000% true
— Hannu ❤️???? (@ItzMeHannu) April 25, 2021
अष्टपैलू जडेजा आयपीएल २०२१ मध्ये वेगळ्याच अंदाजात असल्याचे दिसत आहे. त्याने हंगामातील पहिल्या सामन्यापासूनच आपल्या अष्टपैलू कामगिरीची चुणूक दाखवली आहे. त्यातही बेंगलोरविरुद्धतच्या सामन्यात त्याने फलंदाजी करताना अवघ्या २८ चेंडूत नाबाद ६२ धावा चोपल्या. दरम्यान त्याने ५ षटकार आणि ४ चौकार मारले. याबरोबरच गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या आणि क्षेत्ररक्षण करताना एका फलंदाजाला धावबादही केले.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा! यष्टीचा निशाणा हुकला आणि चेंडू अंपायरला लागला, मग काय रिषभने मोठ्या मनाने मागितली माफी
Video: चिडका पृथ्वी शॉ! धावबाद झाल्यानंतर पंतवर संतापला, डगआउटमध्ये केलं असं काही
‘संघ सहकारी संजूला कर्णधार बनवल्याने खुश नाहीत वाटतं, म्हणून…’ माजी भारतीय क्रिकेटरने मांडले मत






