MS Dhoni Answer to RCB Fan: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेसाठीचा लिलाव नुकताच पार पडला. चेन्नई सुपर किंग्स संघाने आधीच आपले अनेक खेळाडू रिटेन केले होते. त्यानंतर या लिलावात 6 खेळाडूंना खरेदी करत आपला संघ आणखी मजबूत केला. संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी लिलावाच्या हॉलमध्ये बसला नव्हता, पण त्याने सांगितलेल्या खेळाडूंना सीएसकेने खरेदी केल्याचे सीईओंनी स्वत: सांगितले. असे असले, तरीही धोनीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा एक चाहता धोनीला प्रश्न विचारताना दिसत आहे.
खरं तर, विराट कोहली (Virat Kohli) याच्या आरसीबी (RCB) संघाच्या चाहत्याने एमएस धोनी (MS Dhoni) याला एक ट्रॉफी जिंकून देण्यासाठी संघ जॉईन करण्याविषयी प्रश्न विचारला. यावर माहीने आपल्या उत्तराने सर्वांना खुश केले. एका चर्चेदरम्यान चाहत्याने धोनीला विचारले की, “मी 16 वर्षांपासून आरसीबीचा कट्टर चाहता राहिलो आहे आणि ज्याप्रकारे तुम्ही सीएसकेसाठी 5 किताब जिंकले आहेत, माझी इच्छा आहे की, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आमच्यासाठी 1 ट्रॉफी जिंकावी.”
थालाचे विधान इंटरनेटवर व्हायरल
सीएसकेचा (CSK) कर्णधार धोनी म्हणाला की, आरसीबीने या लीगसाठी एक चांगला संघ तयार केला आहे. तो म्हणाला, “तुम्हाला माहितीये, तो एक खूप चांगला संघ आहे. तसेच, तुम्हाला हेदेखील पाहण्याची गरज आहे की, क्रिकेटमध्ये सर्वकाही योजनेनुसार होत नाही. जर तुम्ही आयपीएलविषयी बोलत आहात, तर आयपीएलमध्ये सर्व 10 संघांकडे पूर्ण खेळाडू आहेत आणि हे सर्व 10 मजबूत संघ आहेत.”
An RCB fan’s request to Thala Dhoni to support and win an IPL Trophy for them ! 😀#ThalaForAReason #Dhoni #MSDhoni pic.twitter.com/1IeG38BCHM
— Saravanan Hari 💛🦁🏏 (@CricSuperFan) December 20, 2023
धोनी पुढे बोलताना म्हणाला की, “समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा दुखापतीमुळे तुमचे काही खेळाडू गायब आहेत. त्यामुळे, तो एक चांगला संघ आहे. सर्वांकडे आयपीएलमध्ये योग्य संधी आहे. आतापर्यंत माझ्याकडे असे आहे, माझ्या संघात चिंता करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. मी प्रत्येक संघाला शुभेच्छा देऊ इच्छितो, पण यापेक्षा जास्त मी आता जास्त काही करू शकत नाही. कल्पना करा की, मी इतर संघाला पाठिंबा देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी पुढे येत आहे. आमच्या प्रेक्षकांना कसे वाटेल?”
आयपीएल 2024साठी सीएसके संघ
एमएस धोनी आयपीएल 2024 (MS Dhoni IPL 2024) हंगामात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचे नेतृत्व करताना दिसेल. आयपीएल 2024साठी सीएसकेच्या 25 सदस्यीय संघात 8 परदेशी खेळाडू आहेत. पाच वेळच्या आयपीएल किताब विजेत्या सीएसकेने लिलावात डॅरिल मिचेल (14 कोटी), समीर रिझवी (8.40 कोटी), शार्दुल टाकूर (4 कोटी), मुस्तफिजूर रहमान (2 कोटी) आणि रचिन रवींद्र (1.80 कोटी) यांना आपल्या संघात घेतले.
याव्यतिरिक्त सीएसकेने कर्णधार एमएस धोनी, मोईन अली, दीपक चाहर, डेवॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, महीश थीक्षणा, मिचेल सँटनर आणि अजिंक्य रहाणे यांना संघात कायम ठेवले आहे. (csk captain ms dhoni reply to rcb fans who request to join virat kohli team ipl 2024)
हेही वाचा-
INDvsSA 3rd ODI: तिसऱ्या वनडेतही यजमानांनीच जिंकला टॉस, भारताकडून ‘या’ विस्फोटक खेळाडूचे पदार्पण
‘मला कसलाही पश्चाताप नाही, उलट…’, 24.75 कोटींची बोली लागलेल्या स्टार्कचे 8 IPL हंगाम न खेळण्याविषयी भाष्य