---Advertisement---

ठरलं!! चेन्नईचे स्टार खेळाडू रायडू आणि ब्राव्हो ‘या’ सामन्यात करणार पुनरागमन

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 2:56 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना (आयपीएल 2020) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला.  या सामन्यात अंबाती रायुडू सीएसकेचा स्टार परफॉर्मर होता. उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या या खेळाडूने 48 चेंडूत 71 धावांची खेळी केली आणि संघाने 163 धावांचे लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात रायुडूला ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला. पण त्यानंतर पुढच्या दोन सामन्यात रायुडूला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले.

या सामन्यानंतर तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या सीएसकेने राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांविरुद्धचे सामने गमावले. रायुडूच्या अनुपस्थितीचा परिणाम सीएसकेच्या फलंदाजीवर झाला. त्यातच सीएसकेचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो देखील दुखापतीमुळे पहिल्या तीनही सामन्यांना मुकला आहे.

अशा परिस्थितीत सीएसकेचे चाहते अंबाती रायुडू आणि ब्रावो पुन्हा एकदा सीएसके संघात परत येण्याची वाट पहात आहेत. रायुडूच्या पुनरामनाबद्दल सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वनाथन स्पोर्टस्टारला म्हणाले, “रायडू हॅमस्ट्रिंगच्या त्रासातून बरा झाला आहे आणि पुढच्या सामन्यात खेळेल.”  त्याने प्रशिक्षणादरम्यान धावण्याचा सराव केला आणि कोणत्याही अडचणीशिवाय नेटमध्ये फलंदाजीही केली.”

ब्राव्हो नेटमध्ये चांगली गोलंदाजी करतोय –

ड्वेन ब्राव्हो हा चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे.  ब्राव्होने आतापर्यंत सीएसकेचे तीनही सामने खेळलेले नाहीत.  सॅम करन त्याच्या जागी संघाचा भाग झाला, परंतु चाहते अजूनही मैदानावर ब्राव्होला पाहण्यासाठी वाट पाहत आहेत.

ड्वेन ब्राव्होच्या पुनरागमनाविषयी के.एस. विश्वनाथन सांगितले की, ‘तो नेटमध्ये चांगली गोलंदाजी करतोय.’ शेवटच्या दोन सामन्यात सीएसकेचा पराभव झाल्यानंतर ते म्हणाले की, पुढच्या सामन्यात आम्ही चांगले पुनरागमन करू.  यापूर्वी आम्ही पराभवानंतर अनेकदा पुनरागमन केले आहे. यावेळीही आम्ही करु.”

चेन्नई सुपर किंग्ज आपला पुढील सामना शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादशी खेळणार आहे.  पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करणार्‍या हैदराबादने आपल्या तिसर्‍या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव केला. या विजयानंतर सनरायझर्सचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे सुरेश रैना आणि हरभजन सिंगची कमतरता सीएसके संघात जाणवत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---