---Advertisement---

सीएसकेच्या सीईओंना काढावी लागली जडेजाची समजूत! गुजरातविरुद्ध जिंकूनही अष्टपैलू नाराज?

Ravindra Jadeja Kashi Viswanathan
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज मंगळवारी (23 मे) आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचली. इंडियन प्रीमियर लीग 2023चा पहिला क्वॉलिफायर सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळळा गेला. सीएसकेने हा सामना 15 धावांनी जिंकल्यामुळे अंतिम सामन्यात जाण्याठी सीएशकेला क्वॉलिफायर दोन जिंकवी लागेल. सीएसके कर्णधार एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा यांच्यातील वादही मागच्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. दोघांमधील वाद आता सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्यापर्यंत गेल्याचे बोलले जात आहे.

एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा (MS Dhoni vs Ravindra Jadeja) मोठ्या काळापासून एकत्र खेळत आले आहेत. आधी भारतीय संघासाठी या दोघांनी एकत्र क्रिकेट खेळले आणि सीएसकेसाठी अजूनही एकत्र खेलत आहेत. असे असले तरी, मागच्या काही दिवसांपासून जडेजा आणि धोनीमध्ये काहीतरी बिनसल्याचे दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार दोघांमध्ये लाईव्ह सामन्यात मतभेद झाले होते. त्यानंतर जडेजाने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होत्या. या पोस्टमधून दोघांच्या वादाला हवा मिळत असल्याचे पाहायला मिळाले होते. मंगळवारी जडेजाने क्वॉलिफायर एकमध्ये सीएसकेसाठी चमकदार कामगिरी केली आणि विजयात महत्वाचे योगदान दिले.

सामना जिंकल्यानंतर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन (Kashi Viswanathan) जडेजाशी चर्चा करताना दिसले. विश्वनाथन जडेजाशी काही मैदानात असताना काहीच मिनिट बोलले. पण यादरम्यान त्यांनी अगदी त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता. चाहत्यांचा असा समज होत आहे की, विश्वनाथन जडेजाची समजूत काढत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत आहेत.

https://twitter.com/TedBharat/status/1661104656054091776?s=20

दरम्यान, या सामन्यात जडेजाने घेतलेल्या दोन विकेट्स आणि 22 धावांच्या योगदानासाठी त्याला बक्षीसही मिळाले. ऋतुराज गायकवाड सामनावीर, तर जडेजा अपस्टॉक्स मोस्ट वॅल्यूएबल प्लेअर ऑफ द मॅच ठरला. जडेजाने हा पुरस्कार मिळालेला फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला. पण त्याच्याबोत दिलेल्या कॅप्शनमध्ये धोनीसोबतच्या त्याचा वादाची चर्चा पुन्हा सुरू झाली. “अपस्टॉक्सला माहीत आहे… पण काही चाहत्यांना माहीत नाहीये,” असे कॅप्शन जडेजाने या पोस्टला दिले.

https://twitter.com/imjadeja/status/1661110781512142849?s=20

अनेकांच्या मते या पोस्टच्या माध्यमातून जडेजाने एकप्रकारे एमएस धोनीवर निशाणा साधला आहे. धोनीला नेहमीच जडेजापेक्षा जास्त लोकप्रियता मिळत आल्याने त्याने अशी पोस्ट केली, असे अनेकांचे मत आहे. (CSK CEO Kashi Viswanathan seen convincing Ravindra Jadeja after their win against Gujarat Titans)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20त घडला इतिहास! भारतीय मूळ असलेल्या ‘या’ धुरंधराने 49 चेंडूत ठोकल्या 144 धावा, टोटल होती 324
पंच धोनीला नियंत्रणात ठेवू शकत नाहीत! सीएसके कर्णधाराच्या रणनीतीवर ऑस्ट्रेलियन दिग्गज नाराज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---