इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) सांगता झाली. या हंगामाचे विजेतेपद एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने मिळवले. चेन्नईने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला २७ धावांनी पराभूत करत चौथ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले. आता आयपीएल संपल्याने सर्वांना वेध लागले आहेत, ते आगामी टी२० विश्वचषकाचे.
यंदाचा टी२० विश्वचषक संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे होत आहे. या विश्वचषकासाठी चेन्नई सुपर किंग्सचे विद्यमान प्रशिक्षक आणि माजी न्यूझीलंड कर्णधार स्टिफन फ्लेमिंग आता न्यूझीलंड संघाला पुढील काही दिवसांसाठी जोडले गेले आहेत.
फ्लेमिंग यांनी चेन्नई सुपर किंग्सला चौथे आयपीएल विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. विशेष म्हणजे चेन्नईने चारही आयपीएल विजेतेपद फ्लेमिंग यांच्या प्रशिक्षणाखाली जिंकली आहेत. त्यांची आणि धोनीची जोडी चेन्नई संघासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाची भूमिका निभावत आहे. फ्लेमिंग हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी प्रशिक्षकही आहेत. आजपर्यंत कोणत्यात प्रशिक्षकाला आयपीएलमध्ये ४ विजेतीपदं जिंकता आलेली नाहीयेत.
आता आयपीएल २०२१ हंगामानंतर फ्लेमिंग टी२० विश्वचषकासाठी युएईमध्ये तयारी करत असलेल्या न्यूझीलंड संघाशी जोडले गेले आहेत. ते तिथे पुढील काही दिवसांसाठी असतील. तसेच संघाला मार्गदर्शन करतील. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्यांचा न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनसह चर्चा करतानाचा फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर थेट इथे. चेन्नई सुपर किंग्सचे विजेते प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग टी२० विश्वचषकाला सुरुवात करण्यापूर्वी पुढील काही दिवसांसाठी आम्हाला जोडले गेले आहेत.’
Fresh from the @IPL Final – it’s great to have @ChennaiIPL winning coach @SPFleming7 joining us for a few days ahead of the start of the @T20WorldCup #T20WorldCup pic.twitter.com/O0tmGwdaxL
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 16, 2021
फ्लेमिंगचे न्यूझीलंडला, तर धोनीचे भारतीय संघाला मार्गदर्शन
आता आयपीएलच्या समाप्तीनंतर फ्लेमिंग न्यूझीलंडशी जोडले गेले आहेत, तर धोनी भारतीय संघाला जोडला जाईल. कारण आगामी टी२० विश्वचषकासाठी धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शक आहे. विशेष म्हणजे भारत आणि न्यूझीलंडचा सुपर १२ फेरीसाठी एकाच गटात समावेश आहे. या गटात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि पहिल्या फेरीतून पात्र ठरणाऱ्या दोन संघांचा समावेश आहे. भारत आणि न्यूझीलंड संघात ३१ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईचे कट्टर समर्थक आहात ना? मग ‘या’ आठ जणांविषयी तुम्हाला माहीतच हवे
धोनीकडून घडली मोठी चूक अन् जडेजा- गायकवाडने लावला डोक्याला हात; व्हिडिओ पाहाच