---Advertisement---

प्लेऑफमध्ये स्थान तर मिळवले, आता काय असेल चेन्नईची पुढील योजना, मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंगकडून स्पष्टीकरण

On: शनिवार, ऑक्टोबर 2, 2021 1:37 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केल्याने चेन्नई सुपर किंग्सला वरिष्ठ खेळाडूंच्या कामाचा ताण कमी करण्याची संधी मिळाली आहे. चेन्नईने पहिल्या ११ सामन्यांतील ९ सामने जिंकत प्लेऑफमधील स्थान पक्के केले. यानंतर पुढील वाटचालीबद्दल चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने यांनी स्पष्टपणे सांगितले की, संघ व्यवस्थापन जास्त प्रयोग करणार नाही. चेन्नई सुपर किंग्सने गुरुवारी सनरायझर्स हैदराबादचा ६ गडी राखून पराभव करत गुरुवारी (३० सप्टेंबर) आयपीएल प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले.

फ्लेमिंग म्हणाले की, ‘मी खेळाडूंच्या फॉर्मबद्दल जास्त बोलत नाही. आम्हाला काही खेळाडूंच्या कामाचा ताण अधिक चांगल्या प्रकारे सांभाळावा लागेल. आमच्याकडे एक दिवस आहे आणि मग अबूधाबीला जायचे आहे. मग एक दिवस आहे आणि मग आम्ही सामना खेळू. अशा परिस्थितीत आम्ही बाकावर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ शकतो. पण आम्ही या सामन्यांत जास्त प्रयोग करणार नाहीत.’

तीन वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकलेल्या चेन्नईचे ११ सामन्यात ९ विजय मिळवल्यानंतर १८ गुण झाले आहेत. याशिवाय प्लेऑफमध्ये पोहोचणारा चेन्नई पहिला संघ ठरला आहे. गेल्या वर्षी चेन्नईचा संघ प्रथमच प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नव्हता आणि सातव्या स्थानावर राहिला होता.

फ्लेमिंग म्हणाले की, त्यांनी गेल्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना या मोसमात जोरदार पुनरागमन करण्याचा आत्मविश्वास मिळाला. गेल्या मोसमाबद्दल के म्हणाले सरतेशेवटी, आम्ही सलग चार सामने जिंकले आहेत. स्पर्धेच्या पूर्वार्धात बऱ्याच चुका झाल्या. आमचा फॉर्म खराब होता आणि आमचा आत्मविश्वास कमी झाला होता, पण ज्याप्रकारे आम्ही शेवटचा सामना खेळलो त्यावरून आम्हाला खात्री होती की आम्ही जोरदार पुनरागमन करू.

ते पुढे म्हणाले की, आम्ही आत्मपरीक्षण केले. आम्ही चांगली कामगिरी केली नाही. असे असूनही, आम्ही सकारात्मक वातावरण राखले आणि आमचे विचार स्थिर राहतील याची काळजी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

सांगली एक्सप्रेस सुसाट! मंधनाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळीसह ७२ वर्षे जुन्या विक्रमालाही धक्का

महेला जयवर्धनेने हार्दिक पांड्याचे पितळ पाडले उघडे, फिटनेसबद्दल दिली महत्त्वाची माहिती

विक्रमी शतक झळकावल्यानंतर मंधनावर कौतुकाचा वर्षाव, या माजी क्रिकेटरने म्हटले ‘ऑफ साईडची देवी’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---